अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिच्या ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान तिच्यासोबत सह-कलाकार अर्जुन कपूर देखील होता. त्याचबरोबर अर्जुनसोबत संभाषणादरम्यान ती अनेक गोष्टींवर बोलली. ती म्हणाली की, सोशल मीडियावरील टीका तिला समजतात आणि ती हे सर्व सकारात्मकपणे स्वीकारते. अर्जुनने अलिकडेच ‘बक बक विथ बाबा’ नावाचं एक सोशल मीडिया चॅट सेशन सुरू केलं आहे. ज्यामध्ये तो इंडस्ट्रीतील मित्र आणि कुटुंबियांशी बोलून चाहत्यांना माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेतो. त्याने जॅकलिनसोबतही चर्चा केली. यावेळी तिने तिचं पहिलं क्रश, तिचा फिटनेस प्रवास आणि ट्रोलर्सला कसे सामोरे जावे याबद्दल सर्व काही उघड केले. (Actress Jacqueline Fernandez reveals about her first crush)
जॅकलिनला म्हटले गेले ‘भयंकर’
अर्जुनने जॅकलिनला विचारले की, “तू सोशल मीडियावर तुझ्याबद्दल वाचलेली सर्वात वाईट गोष्ट कोणती?” जॅकलिन उत्तर देत म्हणाली की, “अनेक वाईट गोष्टी आहेत. ठीक आहे, आपल्या सर्वजण असे मॅसेज रिसिव्ह करतो. मी माझ्याबद्दल वाचले की, मी किती भयंकर दिसते. माझे उच्चारण किती भयंकर आहे आणि मी हिंदी कसे बोलते, अशा वाईट प्रतिक्रिया समोर येतात. पण मी ते सकारात्मकपणे घेते.”
‘हा’ हॉलीवूड स्टार आहे क्रश!
अर्जुनसोबत बोलत असताना तिच्या पहिल्या क्रशबद्दल जॅकलिन म्हणाली की, “माझा शाळेत क्रश होता, पण मी त्याचे नाव सांगू शकत नाही. मात्र ‘रोमियो ऍंड ज्युलियट’, ‘टायटॅनिक’ आणि ‘बॅकस्ट्रीट बॉईज’ पाहिल्यानंतर मला लिओनार्डो डिकॅप्रियो ही खूप आवडायचा.”
कधीच केलं नाही हे काम
जॅकलिन फर्नांडिस पुढे अर्जुनला म्हणाली की, ती कधीच ब्लाइंड डेटवर गेली नाही. त्याचबरोबर या चॅट शोमध्ये तिने आपल्या खाण्याच्या सवयीबद्दलही अनेक खुलासे केले आहेत.
केक, आइस्क्रीम आणि कुरकुरे
अर्जुन कपूरने जॅकलिनला विचारले की, तिच्यासाठी अन्न किती महत्त्वाचे आहे? जॅकलिनने सांगितले की, तिला नेहमी जेवणासोबत सेलिब्रेट करायला आवडते. जॅकलिन असेही म्हणाली की, “मी २० वर्षांची होते, तेव्हा अन्नाकडे माझा कल वाढत चालला होता. मी एकटीच राहायचे, म्हणून मी केक, आइस्क्रीम, कुरकुरे काहीही खायचे. माझा खरोखरच अन्नाशी भयंकर संबंध होता. परंतु नंतर मला माझ्या आरोग्यामुळे, एका आठवड्यासाठी कमी खाण्यास सांगितले गेले, जे खरोखर अस्वस्थ करणारे होते.”
त्याचबरोबर ‘भूत पोलीस’ या हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन कपूरने जॅकलिन फर्नांडिससोबत महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…