Monday, July 1, 2024

सुकेशसोबतच्या वादानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाली जॅकलीन फर्नांडिस, साजरा केला Valentine’s Day!

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागच्या काही दिवसांपासुन तिचा बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरसोबतच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आली होती. सुकेश चंद्रशेखरवर करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याच काळात त्याच्या आणि जॅकलीन फर्नांडिसच्या व्हायरल फोटोने सगळीकडे खळबळ माजवली होती. तेव्हापासुन जॅकलीनने कॅमेर्‍यासमोर येणे टाळले होते आता पहिल्यांदाच जॅकलीनने माध्यमांना सामोरे जात फोटो पोझ दिल्या आहेत. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मागच्या वर्षीपासून अभिनेत्री जॅकलीन आणि सुकेश चंद्रशेखर यांच्या व्हायरल फोटोंनी सगळीकडे खळबळ माजवली होती. करोडोंच्या घोटाळ्याचे आरोप असलेल्या सुकेशसोबत जॅकलीनने फोटो काढले होते. याकाळात सुकेशने जॅकलीनला दिलेल्या महागड्या भेट वस्तूंची सुद्धा सर्वत्र चर्चा रंगली होती. सुकेशनेसुद्धा जॅकलीनसोबतच्या प्रेम प्रकरणाची कबुली दिली होती. त्यामुळे या प्रकरणाला चांगलीच चर्चा मिळाली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री जॅकलीनने माध्यमांना त्यांचे फोटो व्हायरल न करण्याचे आव्हान केले होते. यावेळी तिने विनंती केली होती की, “मी सध्या खूप अडचणीत असून माझे माध्यमांशी आणि चाहत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आमचे फोटो व्हायरल करू नका.” तेव्हापासुन कॅमेऱ्यासमोर न येणारी जॅकलीन वॅलेंनटाईन डे दिवशी आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसून आली. तिने कॅमेऱ्यासमोर येत मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि फोटो सुधा काढले आहेत जे सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

तत्पूर्वी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नुकतीच ‘भूत पुलिस’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्या सोबत अभिनेता सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. आता लवकरच जॅकलीन ‘रामसेतू’ , ‘बच्चन पांडे’, ‘सर्कस’ या चित्रपटात झळकणार आहे. तिच्या मूड मूड के गाण्याने सुद्धा सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा