बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा ‘मिली’ हा चित्रपट आज (दि. 4 नाेव्हेंबर)ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट लोकांना किती आवडेल आणि किती कमाई करेल हे येणारा काळच सांगेल. पण यादरम्यान जान्हवीने स्वतःला एक गिफ्ट दिले आहे आणि तेही 65 कोटींचे. जान्हवीने वांद्रे येथे 65 कोटींचे डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केल्याचे वृत्त आहे. ही बातमी समोर आल्यापासून लोक जान्हवीच्या बँक बॅलन्सबद्दल बोलू लागले आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूर (janhvi kapoor) हिचे आतापर्यंतचे चित्रपट पाहिले तर सर्वसामान्य आहेत. अशा परिस्थितीत जेव्हापासून जान्हवीने अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे, तेव्हापासून ही गोष्ट लोकांना पचनी पडत नाही आहे. यासंदर्भात सोशल मीडिया युजर्स विविध प्रश्न विचारत आहेत.
View this post on Instagram
माध्यमातील वृत्तानुसार, जान्हवीने बहीण खुशी आणि पापा बोनी कपूरसोबत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा डुप्लेक्स 8,669 स्क्वेअर फूटमध्ये 6421 स्क्वेअर फूट कार्पेट एरियासह पसरलेला आहे. या मालमत्तेची नोंदणी 12 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. तसेच, जान्हवीने स्टॅम्प ड्यूटी म्हणून 3.90 कोटी रुपये जमा केले आहेत.
माध्यमातील वृत्तानुसार, जान्हवीने नुकतेच जुहू येथील तिचे 3,456 स्क्वेअर फूट अपार्टमेंट राजकुमार रावला 44 कोटी रुपयांना विकले. या बातमीनंतर लोक जान्हवीबद्दल अनेक गोष्टी बोलू लागले आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “फ्लॉप चित्रपट आलिशान घरे देत आहेत.” तर दुसर्य़ाने कमेंट करत लिहिले, “बापाचा पैसा आहे काहीही करतात’. तर एका युजर्सने चक्क कमेंट करत विचारले, “वर्षातून असे किती चित्रपट करते? सलमान आहे का?”
जान्हवी कपूरबाबत बाेलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी असे बाेलले जात हाेते की, बाेनी कपूर पैसे देऊन जान्हवीला चित्रपट मिळवून देत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ओटीटी विश्वात ‘अमोल टीव्ही’ची धमाकेदार एन्ट्री संजय पारेकर आणि सचिन पारेकरांच्या अमोल प्रोडक्शनचं नवं पाऊल
अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता मिलिंद गुरव झळकणार रूपेरी पडद्यावर










