Wednesday, July 3, 2024

‘गुड लक जेरी’साठी जान्हवी कपूरने शिकल्या होत्या बिहारी शिव्या

अभिनेत्री जान्हवी कपूरचे (janhavi kapoor) चाहते तिच्या ‘गुड लक जेरी’ (good luck jerry)  या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अलीकडेच जान्हवीचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते खूप उत्सुक आहेत. सिद्धार्थ सेन दिग्दर्शित हा चित्रपट २९ जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाऊ शकतो.

जान्हवी ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या पात्रावर खूप मेहनत घेते. या चित्रपटासाठीही जान्हवीने आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘धडक’ या तिच्या पहिल्या चित्रपटातून राजस्थानी बोलणारी जान्हवी या चित्रपटात बिहारी स्वरात बोलताना दिसणार आहे. चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा एका छोट्या शहरातील मुलीची आहे, ज्यामुळे तिला या टोनमध्ये बोलण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागले.

जान्हवीने स्वतः बिहारी भाषा शिकल्याची बाब मान्य केली आहे. तिने सांगितले की. गणेश सर आणि श्री विनोद यांनी त्यांना ही भाषा समजण्यात खूप मदत केली. यासाठी तिने कार्यशाळा घेतल्या, गाणी ऐकली आणि बिहारीमध्ये शिवीगाळ करण्याचे प्रशिक्षणही घेतले, असे अभिनेत्रीने सांगितले. जान्हवी सांगते की, तिने यादरम्यान खूप मजा केली. जान्हवीने स्वतः बिहारी भाषा शिकल्याची बाब मान्य केली आहे. जान्हवी सांगते की, तिने यादरम्यान खूप मजा केली.

‘गुड लक जेरी’ हा तमिळ चित्रपट ‘कोलमावू कोकिला’चा रिमेक आहे. या चित्रपटाची कथा एका मुलीची आहे जी आपल्या आईचा आजार बरा करण्यासाठी खूप संघर्ष करते. या चित्रपटात जान्हवीशिवाय दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ आणि नीरज सूद हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कामाच्या आघाडीवर, जान्हवी शेवटची ‘रुही’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती रुही अरोरा आणि अफसाना बेदीच्या भूमिकेत दिसली होती. दुसरीकडे, तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच वरुण धवनसोबत ‘बावल’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी नितेशने ‘दंगल’ आणि ‘छिछोरे’ सारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

एकेकाळी मिस इंडिया असलेल्या मधू सप्रेने मिलिंद सोमणसोबतच्या न्यूड फोटोंनी उडवली खळबळ

‘लस्ट स्टोरीज २’मध्ये दिसणार काजोल? OTT बद्दल म्हणाली, ‘२४ इंच कंबर नसतानाही लोक स्टार आहेत’

बाबो! चक्क ५ सिंहानी केला स्पर्धकावर हल्ला, बघ्यांनी घातली तोंडात बोटं

हे देखील वाचा