‘कॉफी विथ करण ७‘ या शोमध्ये कलाकार हजेरी लावताना दिसत आहे. तसेच, आपल्या आयुष्यातील गुपीत गोष्टींचा खुलासाही करताना दिसत आहेत. यावेळी सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी सहभाग घेतला होता. यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींविषयी चर्चा केली. तसेच, त्यांनी सिनेसृष्टीबद्दल जी काही चर्चा केली, ते पाहून चाहतेही चांगलेच खुश झाले. शोमध्ये दोघींनीही बक्षीस जिंकण्यासाठी रॅपिड फायर राऊंडदेखील खेळला. यादरम्यान अनेक मजेशीर गोष्टी शेअर करत त्यांनी प्रेक्षकांचा दिवस खास बनवला.
सारा आणि जान्हवीने एकमेकींच्या भावांना केलंय डेट?
‘कॉफी विथ करण सीझन ७’ या शोमध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या मैत्रीबद्दलही करणने चर्चा केली. तो म्हणाला की, “तुम्हा दोघांच्या मैत्रीची पातळी काय आहे, हे मला माहीत नाही, पण जितकं मला माहीत आहे, तिथपर्यंत तुम्ही दोघींनीही एकमेकांच्या भावांना डेट केले आहे.” करणच्या या गोष्टी ऐकून दोघींनाही आधी धक्का बसतो आणि नंतर त्या पुन्हा हसायला लागतात. यानंतर सारा म्हणते की, “असं झालं होतं का?” यावर जान्हवी म्हणते की, “असे कधीच झाले नाही.”
View this post on Instagram
जान्हवीने शिक्षकासोबतच केले होते फ्लर्ट
सारा आणि जान्हवीसाठी ‘कॉफी बिंगो’ गेमही खूप मनोरंजक ठरला. हा गेम खेळत असताना जान्हवीने स्पष्ट केले की, तिच्या शाळेच्या दिवसात तिच्या शिक्षकाचे तिच्यावर क्रश होते. मात्र, त्या शिक्षकाचे नाव विसरल्याचे तिने सांगितले. शिक्षिकेचा लूक आठवून ती म्हणते की, “तो थोडा टकला आणि खादाड होता, पण खूप गोंडस होता. कधीकधी मी पण हजेरी किंवा इतर कोणताही त्रास टाळण्यासाठी फ्लर्ट करायचे.”
View this post on Instagram
‘गुड लक जेरी’मध्ये दिसणार जान्हवी
जान्हवीच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’ (Good Luck Jerry) हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ सेन गुप्ता यांच्या या सिनेमाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत. जान्हवीचा सिनेमा २९ जुलै रोजी सिनेमागृहांऐवजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ना लग्न… ना एंगेजमेंट’, ललित मोदींसोबत डेटिंगची घोषणा केल्यानंतर सुष्मिता सेनची पहिली पोस्ट चर्चेत
पधारो म्हारे देस! डोहाळे जेवणासाठी लंडनहून भारतात परतली सोनम, थाटात पार पडणार सोहळा
कुणाला टांगलं उलटं, तर कुणाच्या अंगावर सोडले कुत्रे; ‘खतरों के खिलाडी १२’मधील स्पर्धकांवर ‘अत्याचार’