Monday, July 1, 2024

‘तू श्रीदेवीचे नाव खराब करत आहे’, जान्हवी कपूरने हॉट फोट शेअर करताच नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फॉलोवर्सची संख्या‌ प्रचंड असल्याकारणाने, तिचा कोणताही फोटो शेअर होताच सगळीकडे व्हायरल होत असतो. जान्हवी कपूरने नुकतेच मालदीवमधील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. निसर्गरम्य वातावरण आणि तेथील ठिकाणे जान्हवीने अनेक आपल्या पोस्टद्वारे प्रेक्षकांना दाखवली आहेत.

जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्विमिंगसुट मधील एक फोटो पोस्ट केला होता. तिच्या या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत होती. हा फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी मालदीवमधला आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो बघून तर सोशल मीडियावरील पारा चढला आहे. तिचे सगळे चाहते भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये तिने गोल्ड फ्लोरल ड्रेस घातला आहे. तसेच एका साईडला केस रिकामे सोडले आहेत. या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच आकर्षक दिसत आहे.

नेहमीप्रमाणेच हा फोटो देखील तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोवर सातत्याने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडताना दिसत आहे. काहींना आवडला, तर काहींनी तिच्या या लूकवरून तिला ट्रोल देखील केले आहे. जान्हवीच्या या फोटोवर अनेक बॉलिवूड स्टार्सनी कमेंट केल्या आहेत. तसेच जान्हवीची छोटी बहीण खुशी कपूर हिने देखील यावर कमेंट केली आहे. तसेच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिनेदेखील जान्हवीच्या‌ या‌ हॉट फोटोवर कमेंट केली आहे.

तसेच अनेकांना जान्हवीचा हा फोटो आवडला नसल्याचे समोर येत आहे. एका युजरने या फोटोवर कमेंट केली आहे की, “असला अश्लील फोटो तू का पोस्ट केला आहे?” तसेच दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “तू अजूनही बालिश दिसतेस,” तर आणखी एका युजरने लिहिले की, “हा खूप वाईट फोटो आहे.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तू श्रीदेवीचे नाव खराब करत आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-साध्या कपड्यांमध्ये सारा अली खानने लावली स्टेजवर आग, पाहा साराचा बिंधास्त डान्स व्हिडिओ

-‘बेस्ट रिटर्न गिफ्ट भावा…’, नेहा कक्करने भाऊ टोनी आणि पती रोहनप्रीतसोबतचा ‘या’ गाण्यावरील व्हिडिओ केला शेअर

-‘बेबी डॉल’ गाण्यावरील सनीचे ठुमके पाहिले का? मिळालेत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा