बॉलिवूड विश्वातील अनेक कलाकार आहेत जे सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतात. ते नेहमीच स्वतःबद्दल चाहत्यांना काही ना काही माहिती देत असतात. ते चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करतात. जेणेकरून ते सतत प्रसिद्धीच्या झोतात राहू शकतील. याचप्रमाणे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे काही खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर राडा घालत आहे.
जान्हवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने गुलाबी रंगाचा माचिंग हिल्स बूट घातला आहे. त्यासह तिने सुंदर असा मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. ती या लूकमध्ये एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसत आहे.
जान्हवीने तिचे फोटो शेअर करत खास कॅप्शन दिले आहे. ज्यात तिने लिहले की, “बार्बी बेबी.” जान्हवीने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. एका फोटोत तिने कॅमेऱ्याच्या जवळ उभी राहून पोझ दिली आहे, तर दुसऱ्या फोटोत ती डोक्याला हात लावताना दिसत आहे. आणखी फोटोत ती उभी राहून पोझ वेगवेगळ्या पोझमधील फोटो शेअर केले आहेत.
तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. चाहते तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेक चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. हार्ट आणि फायर इमोजी वापरून तिला प्रतिसाद देत आहे. तिच्या या पोस्टला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. जान्हवीने तिची बहीण खुशीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरच्या विरूद्ध ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’ देखील याच वर्षी प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच ‘दोस्ताना २’ आणि ‘गुड लक जेरी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिरव्या रंगाच्या साडीमध्ये कातिल अदा दाखवताना दिसली जान्हवी कपूर
-काळजात घंटी वाजावी असे फोटो शेअर करत जान्हवीने खास अंदाजात चाहत्यांना म्हटले ‘हॅपी दिवाळी’
-स्वतःला फिट ठेवण्यासाठी जान्हवी घेतेय मोठी मेहनत, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल फिदा