Monday, July 1, 2024

काळजात घंटी वाजावी असे फोटो शेअर करत जान्हवीने खास अंदाजात चाहत्यांना म्हटले ‘हॅपी दिवाळी’

दिवाळसणाच्या निमित्ताने अनेक कलाकार त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. चाहते देखील त्यांना कमेंटमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. आतापर्यंत बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापासून ते सोनू सूदपर्यंत अनेक कलाकारांनी सोशलवर पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कलाकारांच्या या यादीत आता अभिनेत्री जान्हवी कपूर देखील सामील झालीये. जान्हवीने देखील तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, तिच्या शुभेच्छा देण्याचा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. याचे कारण तीने शुभेच्छांसोबतच एक झकास फोटो देखील शेअर केला आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. स्वतःचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. चाहते देखील तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. आताही तिने दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश दिला आहे.

जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने या फोटोंमध्ये निळ्या रंगाचा डिझायनर लाँग ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने मॅचिंग ओढणी देखील घेतली आहे. ज्यात तीचे मुळचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “हॅपी दिवाली” असे लिहले आहे.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरच्या विरूद्ध ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’ देखील याच वर्षी प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच ‘दोस्ताना २’ आणि ‘गुड लक जेरी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे देखील वाचा