‘जॅस्मिन भसीन’ आणि ‘एली गोनी’ ही सगळ्याच बिग बॉस चाहत्यांची आवडती जोडी आहे. बिग बॉसमध्ये यांच्या प्रेमाचे किस्से सर्वत्र चर्चेत होते. त्या दोघांची केमिस्ट्री देखील सगळ्यांना खूप आवडते. नुकताच गुरुवारी ‘एली गोनी’ ह्याचा वाढदिवस झाला आहे.
जॅस्मिन भसीन हीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून बॉयफ्रेंड एली गोनी ह्याच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहे. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जैस्मिन आणि तिचे कुटुंब कश्मीरला गेले होते. तिने एलीला सरप्राइज देऊन त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ती खूपच खुश दिसत होती. तिने सगळे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे आणि एक रोमँटिक कॅप्शन देखील दिले आहे.
फोटो शेअर करत जॅस्मिन असे म्हणते की,” वाढदिवसाच्या शुभेच्छा हीरो. या फोटोत माझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे तो फक्त तुझ्यामुळे आहे आणि जेव्हापासून मी तुला भेटले आहे तेव्हापासून तू हा आनंद माझ्यापासून कधीच कमी होऊ देत नाहीस. दररोज तुझ्या डोळ्यात बघून मला त्या गोष्टींची आठवण येते, ज्या मला फक्त आणि फक्त आनंद देतात. तुझ्यामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. तुला खूप खूप प्रेम!!”
एली याचा वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एलीने रेड आणि ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे आणि जैस्मिनने ग्रीन कलरचा सलवार सूट घातला आहे.
एली आणि जॅस्मिन दोघेही ‘खतरों की खिलाडी’ या शोमध्ये एकमेकांचे मित्र झाले आणि त्यानंतर बिग बॉसच्या घरात त्यांच्या प्रेमाला रंग आला. बिग बॉसमध्ये घराच्या बाहेर जाऊनही फॅमिली वीकमध्ये जैस्मिन एलीला सपोर्ट करण्यासाठी पुन्हा घरात आली होती.