बिग बॉसपासून टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन आणि अली गोनी अनेकदा त्यांच्या नात्यामुळे चर्चेत राहतात. जास्मिन आणि अली अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात आणि चाहत्यांना दोघांची केमिस्ट्रीही आवडते. जास्मिन लवकरच एका पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. बिग बॉसमध्ये जास्मिन आणि अली गोनीची केमिस्ट्री खूप आवडली होती. या शोमध्ये दोघेही मित्र म्हणून गेले होते, पण बाहेर येताच दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते. जास्मिन सध्या दुबईत सुट्टीसाठी गेली आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. पण हा बॉयफ्रेंड अली गोनी नसून दुसराच कोणीतरी आहे. हा फोटो पाहून अलीला नक्कीच हेवा वाटणार आहे.
जास्मिन (Jasmin Bhasin) तिच्या व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. ती तिची मैत्रिण आणि अभिनेत्री पूर्वा राणासोबत दुबईत मस्ती करत आहे. गुरुवारी (१० फेब्रुवारी) रात्री दोघीही जेवायला गेल्या. ज्याचे फोटो दोघींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जास्मिनने बॉयफ्रेंडची करून दिली ओळख
जास्मिनने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पुतळ्यासोबत उभी असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “माझा दुबईवाला बॉयफ्रेंड.” त्यासह हसणारे इमोजीही पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये जास्मिनने काळ्या आणि राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
हेही पाहा : CID कलाकारांचा पगार एकदा पहाच तुम्हालाही बसेल धक्का । CID Actors Salary
अलीला करत आहे मिस
पूर्वाने जास्मिनसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “मिस यू अली.” पूर्वा आणि जास्मिन खूप मस्ती करत आहेत आणि चाहत्यांसाठी फोटोही शेअर करत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जास्मिनने आता टीव्ही इंडस्ट्री सोडून पंजाब इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली आहे. ती अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. यासोबतच गिप्पी ग्रेवालसोबत एक पंजाबी चित्रपटही करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटाबाबत माहिती दिली होती.
हेही वाचा –