Saturday, June 29, 2024

जयश्री गडकरांनी वयाच्या 13व्या वर्षीच केले अभिनयात पदार्पण; तर सर्वांपासून लपूनछपून नेहमी करायच्या ‘हे’ काम

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये कौशल्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जयश्री गडकर यांची 29 ऑगस्टला 15वी पुण्यतिथी आहे. जयश्री यांनी त्यांच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर पाच दशके प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले. सुरुवातीपासूनच त्यांना नृत्य आणि गाण्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी कलाक्षेत्रात विशेष कला अवगत केली होता. त्यांच्या एका आत्मचरित्रात त्यांनी लहानपणी चोरून चित्रपट बघायच्या आठवणी शेअर केल्या आहेत. तर त्यांनी लहान वयातच नृत्य शिकायला सुरुवात केली होती. यासाठी त्या गोपी कृष्ण यांच्याकडून कथ्थक शिकल्या आणि नंतर गायन शिकल्या.

जयश्री यांचा जन्म 21 मार्च 1942 रोजी कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील सदाशिवगडच्या गावात एका साध्या कोंकणी कुटुंबात झाला. त्यांना मीना, जया आणि नंतर जयश्री म्हणून ओळखले जाऊ लागले. जेव्हा त्या पाच वर्षांची होत्या, तेव्हा त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतर झाले आणि त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण मुंबईत पुर्ण केले.

‘या’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात केले पदार्पण
जयश्री यांनी बालकलाकार म्हणून मराठी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट ‘तमाशा’ होता. यानंतर, 1995 मध्ये, व्ही. शांताराम यांचा चित्रपट ‘झनक झनक झनक पायल बाजे’ या एका गाण्यात नाचणाऱ्या मुलींपैकी एक म्हणजे जयश्री होत्या. त्यावेळी त्या फक्त 13 वर्षांच्या होत्या.

पहिल्यांदा नृत्य करण्याची मिळाली संधी
रशियाचे नेते ख्रुश्चेव यांनी भारताला भेट दिली होती. त्यावेळी या भेटीनिमीत्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि याच वेळी जयश्री गडकर यांना पुण्यातील कार्यक्रमात प्रथमच नृत्य करण्याची संधी मिळाली. या दरम्यान, पुण्यातील फोटोग्राफर राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांचे फोटो काढले आणि ते त्यांच्या स्टुडिओमध्ये ठेवले. हे फोटो दिनकर पाटील यांनी पाहिले आणि त्यांना ‘दिसतं तसं नसतं’ चित्रपटात नृत्य करण्याची संधी मिळाली.

‘या’ हिंदी चित्रपटांमध्येही केलंय काम
त्या काळात राजा परांजपे यांनी जयश्री गडकरांना पाहिले आणि त्यांना ‘गठ पडली थाका थाका’ चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्या हळूहळू पुढे जात राहिल्या आणि पुन्हा त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जयश्री यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये ‘सांगते ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’ यांचा समावेश आहे. याशिवाय जयश्री गडकर यांनी ‘ससुराल’, ‘लव कुश’, ‘डिटेक्टिव्ह’, ‘संपूर्ण महाभारत’, ‘जिओ तो ऐसे जिओ’ या हिंदी चित्रपटांमध्येही आपली कामगिरी चोख पार पाडली आहे.

लग्नानंतरही दिलेत ‘हे’ चित्रपट
जयश्री यांनी प्रसिद्ध अभिनेते बाल धुरी यांच्याशी 1075साली लग्न केले. पण, लग्नानंतरही त्यांनी अभिनय सुरू ठेवला. त्यांनी बाल धुरींसोबत काही चित्रपटांमध्ये काम केले. या जोडीने ‘मुंबई टू मॉरिशस’ या चित्रपटात एकत्र काम केले. एवढेच नाही तर या दोघांनी ‘रामायण’ या प्रसिद्ध मालिकेत ही एकत्र काम केले. यामध्ये दशरथची व्यक्तिरेखा बाल धुरींनी साकारली होती आणि जयश्री या माता कौशल्याच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

हेही नक्की वाचा-
जरा इकडे पाहा! कपिलचा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर बाजारात विकतोय लसूण; पाहा व्हिडिओ
बोल्ड अँड ब्यूटीफुल! दुबईच्या रस्त्यांवर नेहाचा हटके अंदाज, पाहा फोटो

हे देखील वाचा