Tuesday, August 5, 2025
Home अन्य अभिनेत्री जेनिफर लोपेज अन् बेसबॉलपटू अलेक्स रोड्रिग्यूसच्या नात्याला पूर्णविराम, साखरपुड्यानंतर दोन वर्षांनी मोडले नाते

अभिनेत्री जेनिफर लोपेज अन् बेसबॉलपटू अलेक्स रोड्रिग्यूसच्या नात्याला पूर्णविराम, साखरपुड्यानंतर दोन वर्षांनी मोडले नाते

हॉलीवूड मधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेज हीचे काही दिवसांपूर्वीच बेसबॉल खेळाडू अलेक्स रोड्रिग्यूस यांच्यासोबत साखरपुडा झाला होता. परंतु आता त्या दोघांचे नाते तुटले आहे, अशा बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपासून त्याच्या नात्यामध्ये खूप वादविवाद चालू होते आणि या दोघांचे नाते तुटले अशी माहिती देखील समोर आली होती. परंतु त्या दोघांनी सोशल मीडियावरील माहिती दिली होती की, “आम्ही आमचं नातं जपण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एकमेकांना वेळ देत आहोत.” परंतु कदाचित यांच्या नात्यामधील कटुता कमी झाली नसावी, आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असावा.

जेनिफर आणि अलेक्स गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या मुलांसोबत राहत आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे, आणि ते दोघेही वेगळे झाले आहेत अशी अधिकृत माहिती त्यांनी दिली आहे. त्या दोघांनी सांगितले की, “आम्हाला असे वाटते कि ,आम्ही एकमेकांचे मित्र म्हणूनच चांगले आहोत. यापुढे एकत्र काम करत जाऊ, बिजनेस प्रोजेक्टमध्ये एकमेकांना सपोर्ट करू एकमेकांची मदत करू. मला असं वाटतं की,आमच्या दोन्ही मुलांनी खूप खुश रहावं. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले आहे.”

जेनिफर आणि अलेक्स गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी 2019 मध्ये साखरपुडा देखील करून ठेवला आहे. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांच्या हातात साखरपुड्याची अंगठी देखील घातली होती. ते दोघे 2005 मध्ये एका स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान भेटले होते. पुढे त्यांच्या नात्याला सुरुवात झाली होती.

त्यांच्या साखरपुड्यानंतर ते दोघे लवकरच लग्नबंधनात देखील अडकणार होते, परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या लग्नाला अडचणी निर्माण झाल्या आणि ते लग्न लांबवले गेले. त्यांचे लग्न 2 वेळा रद्द केले गेले, परंतु आता त्या दोघांचे एकमेकांशी पटत नसल्याने त्यांनी त्यांचे हे नाते संपवले आहे, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे त्या दोघांची चाहते खूपच नाराज झालेले आहेत.

हे देखील वाचा