सध्या लग्नसराईचा सीझन सुरू असून, सर्वसामान्यांसोबतच मनोरंजन विश्वातील कलाकारही एकामागोमाग एक लग्न करत आहेत. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कलाकारांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असतात, तर काही कलाकारांच्या लग्नाची चर्चा होत असते. बॉलिवूडबरोबर हॉलिवूड कलाकारही या बाबतीत मागे नाहीत. सध्या हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रचंड चर्चेत आहे.
आतापर्यंत ५२ वर्षीय जेनिफरने तीन वेळा लग्न केले आहे. परंतु तिला लग्नाचे लाडू इतके गोड वाटतात की, आता तिला चौथ्यांदा ते खायचे आहे. यावरून जेनिफर तिच्या आयुष्यात किती रोमँटिक आहे हे दिसून येते. जेनिफर पुन्हा लग्नगाठ बांधू शकते. सध्या जेनिफर ‘बॅटमॅन’ फेम हॉलिवूड अभिनेता बेन ऍफ्लेकच्या प्रेमात आहे. आता तिने एका मुलाखतीत आपल्या लग्नाबाबत एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली आहे.
जेनिफरचा ‘हॅपिली एव्हर आफ्टर’वर विश्वास
विशेष म्हणजे जेनिफर तिच्या आगामी ‘मॅरी मी’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याच क्रमात ती एका शोमध्ये पोहोचली. या शोमध्ये तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. यावर जेनिफरने हसून अतिशय सुंदरपणे उत्तर दिले. जेनिफर म्हणाली की, “तुम्हाला माहित आहे की, मी खूप रोमँटिक व्यक्ती आहे. मी यापूर्वी अनेकदा लग्न केले आहे. आताही माझा ‘हॅपिली एव्हर आफ्टर’वर पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटते की मी ते करेन.” जेनिफरच्या या बोलण्यावरून असे वाटते की, ती लवकरच बेन ऍफ्लेकचा हात पकडू शकते.
तसे, जेनिफर आणि बेन ऍफ्लेक जेव्हाही एकत्र दिसतात तेव्हा त्यांचे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. गेल्या महिन्यात ‘द लास्ट ड्युलट’ या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दोघे एकत्र दिसले होते. जेनिफरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रीमियरचा एक फोटो देखील शेअर केला. जिथे बेन ऍफ्लेक माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता आणि जेनिफर एका खांबाजवळ संयमाने उभी होती.
आतापर्यंत तीनदा केले आहे लग्न
जेनिफरची ही मुलाखत सोशल मीडियावर जोरदार शेअर केली जात आहे. तसे, जेनिफरच्या तीन लग्नांचा संबंध आहे. तिने १९९७ मध्ये ओजानी नोआशी पहिल्यांदा लग्न केले. हे लग्न केवळ एक वर्ष टिकले. यानंतर २००१ मध्ये जेनिफरने ख्रिस जुडचा हात हातात घेतला मात्र दोन वर्षानंतर ख्रिसने तिची साथ सोडली. त्यानंतर २००४ मध्ये तिने मार्क अँथनीशी लग्न केले. हा विवाह थोडा जास्त काळ टिकला आणि १० वर्षांनंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले.
जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यापूर्वीही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २००२ मध्ये दोघांच्या नात्याला सुरुवात झाली आणि नंतर त्यांचा साखरपुडा झाला. २००४ मध्ये त्यांचा साखरपुडा मोडला आणि ते वेगळे झाले. मात्र यावर्षी पुन्हा एकदा दोघे जवळ आले आहेत. सध्या जेनिफरचा आगामी ‘मॅरी मी’ हा चित्रपट पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा
-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ
-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल










