Wednesday, July 3, 2024

सूरज पांचोलीला दिलासा, जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली. तिच्या या टोकाच्या पावलांमुळे इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ माजली होती. या आत्महत्येमागचे कारण अजूनही अस्पष्टच आहे. याच प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयने न्यायालयाकडे मागितली होती. परंतु ही याचिका सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी (१६ सप्टेंबर) फेटाळली. ही याचिका केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि जियाची आई राबिया खान यांनी दाखल केली होती. या संपूर्ण प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

सीबीआयने न्यायालयाकडे एक ‘ओढणी’ पाठवण्याची परवानगी मागितली होती, जी जियाने फाशीसाठी वापरली होती. जियाच्या आईलाही जिया आणि सूरज पांचोली यांच्यातील ‘डिलीट’ चॅट परत मिळवायचे आहेत. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एफबीआयकडे जप्त केलेला सेलफोन पाठवायचा होता. सूरजचे वकील प्रशांत पाटील यांनी या याचिकांवर आक्षेप घेत म्हटले की, “या प्रकरणाचा निर्णय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच घेतला आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी याचिका फेटाळून लावली होती.” तत्पूर्वी ‘निशब्द’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी जिया खान ३ जून २०१३ रोजी तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती.

सूरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोली आणि त्याची पत्नी अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा आहे. सूरज हा जियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा जियाचा मृत्यू झाला तेव्हा घटनास्थळी तीन पानांची चिठ्ठी मिळाली होती. याच चिठ्ठीच्या आधारे ‘मुंबई पोलिसांनी’ या प्रकरणाची चौकशी केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. ज्यात जिया आणि सूरज यांचे संबंध होते. इतकेच नव्हे तर जियावर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचा देखील आरोप सूरजवर या पत्रातून केला होता. या पत्रात असेही लिहिले होते की, सूरज जियाला शारीरिक वेदना देत असे ज्यामुळे तिने आत्महत्या केली.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा