Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. जुहीने तिच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. बबली, कॉमेडियन, निरागस, रोमँटिक अशा प्रत्येक पात्रात जुहीने तिचे अभिनय कौशल्य दाखवले आहे. जुहीने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले, पण तिची जोडी आमिर खान, शाहरुख खान आणि ऋषी कपूर यांच्यासोबत जास्त पसंत केली गेली. जुही सोमवारी  (13 नोव्हेंबर) तिचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आपण जुही आणि सलमान खानबद्दल एक गोष्ट जाणून घेणार आहोत.

सलमान आणि जुही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. मात्र, त्यांनी एकत्र काम केलेल्या प्रत्येक चित्रपटात त्यांचा फक्त कॅमिओ होता. ‘दीवाना मस्ताना’ चित्रपटात जुही आणि सलमानचे लग्नही झाले होते, पण सलमानचे हे स्वप्न खऱ्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सलमानला जुही चावलासोबत लग्न करायचे होते.

सलमान म्हणाला की, “जुही खूप गोड आहे. मी तिच्या वडिलांनाही विचारले होते की, तुम्ही जुहीला माझ्याशी लग्न करू द्याल का? पण त्यांनी नकार दिला. कदाचित त्यांना मी आवडलो नाही. त्यांना कसला मुलगा हवा होता माहित नाही?”

जुहीने 1997 मध्ये व्यावसायिक जय मेहताला आपला जोडीदार बनवले, जो जुहीपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. तिची इच्छा असती, तर जुही तिच्या कोणत्याही सहकलाकाराशी लग्न करू शकली असती. मात्र, तिने चित्रपटसृष्टीशी संबंधित नसलेल्या व्यक्तीला आपला साथीदार बनवणं पसंत केलं. दोघांची भेट राकेश रोशन यांनी केली होती.

जुही चावलाची चित्रपट कारकीर्द
जुहीने 1986 मध्ये ‘सल्तनत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दोन वर्षांनंतर ती ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि जुही एका रात्रीत स्टार झाली. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा-
‘या’ व्यक्तीची दुसरी पत्नी बनली जुही चावला? अनेक वर्षांनी केला लग्न लपवण्यामागचा खुलासा
काय सांगता!! चक्क आमिर खानसोबत किसिंग सीन द्यायला जुही चावला नव्हती तयार, मग पुढे दिग्दर्शकाने…

हे देखील वाचा