मराठी टेलिव्हिजनवर सध्या अनेक उत्तम मालिका चालू आहे. मात्र यात वेगळी आणि लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’ जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करत भरभरून यश मिळवले आहे. आज ही मालिका टीआरपीमध्ये तर नंबर वन आहे, सोबतच प्रेक्षकांची मने जिंकण्यात देखील ती यशस्वी ठरली आहे. मालिकेने तिच्या कथानकातून तिचे वेगळेपण सिद्ध केले आहे. मालिकेला मिळालेले यश पाहून अभिनेत्री जुई गडकरींच्या सोशल मीडियावर एक हटके पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या कमालीची गाजत आहे.
जुईने सोशल मीडियावर लिहिले, “१३ वा आठवडा नं १
Only and only grateful माय बाप रसिक प्रेक्षकांचे आभार!!!
तुमच्या प्रेमाने मी भाराऊन गेलेय! बघत राहा “ठरलं तर मग!”
सोम- शनि रा ८.३० वाजता STAR Pravah वर
आणि हो, मी ठणठणित आहे! रोज शुट करत आहे! माझ्या accident मुळे मला ”गंभीर” दुखापत झाली आणि आता मला शुट करता येणार नाही असे व्हिडियोज सध्या फिरत आहेत! त्याकडे कृपया लक्ष देऊ नये!! M alright because of ur blessings and wishes!! तसं तर युट्युब वर माझी अनेकदा लग्नं पण झालियेत आणि मला दोन मुलं पण आहेत, माझे अमेरीकेत, दुबईत बंगले पण आहेत! या गोष्टींकडे लक्ष न दिलेलंच बरं!!!
असो! तुम्ही मालिका बघताय ना???”
जुईने तिच्या या पोस्टमधून तिच्या मालिकेबद्दल सोबतच तिच्याबद्दल पसरणाऱ्या अफवांबद्दल देखील तिने या पोस्टमधून भाष्य केले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तू तुझे काम करत राहा. तुझे काम आम्हाला आवडते आम्ही अफवांकडे लक्ष देत नाही” अशा कमेंट्स करत लोकांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जुईचा अपघात झाल्याची बातमी कमालीची व्हायरल झाली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह
विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’