Wednesday, June 26, 2024

अरर! गरिबांच्या मुलांसाेबत काजाेलची ‘ही’ वागणूक पाहून युजर्सने केलं ट्राेल, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल विशेषतः तिच्या मस्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिचा मूड खराब झाल्याचे फार क्वचितच पाहायला मिळते. बहुतेकदा ती हसताना आणि हसवताना दिसते. सोशल मीडियावरही ती अनेकदा चर्चेत असते. मात्र, सध्या कजाेलचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर प्रंचड व्हायरल हाेत आहे. ज्यामुळे तिला युजर्स प्रचंड ट्राेल करत आहेत.

नुकताच काजोल(kajol) हिचा समाेर आलेल्या व्हिडिओमध्ये ती एका दुकानातून बाहेर पडताना दिसत आहे. ती बाहेर निघाली असताना काही गरीब मुले तिला बघूण तिच्याकडे पैसे मागू लागतात. पण काजोल आधी त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून दुर्लक्ष करते. त्यानंतर जेव्हा मुलगी अभिनेत्रीच्या मागे कारजवळ पोहोचते तेव्हा काजोल कशीतरी कारचा दरवाजा उघडते आणि मुलीला पैसे देते. काही वेळातच दुसरे मूल तिथे येतात, त्यामुळे काजोल त्याला पैसे देत नाही आणि गाडीची खिडकी बंद करून तिथून निघून जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओ पाहूण युजर्सने केलं ट्राेल
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सने काजाेलला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक युजर कमेंट करत म्हणाला की,”ती मुलांना पैसे देऊ शकत नाही. तू खरी अभिनेत्री नाहीस.” तर काही युजर्स काजोलच्या समर्थनार्थ कमेंट करत आहेत. काहींचे म्हणणं आहे की, “पैसे दिले तर ते असेच सुरू राहतील.” आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “जेव्हा आम्हीही बाहेर जातो आणि अशी मुले आमच्याकडे येतात, तेव्हा आम्हीही प्रत्येकाला पैसे वाटून देतो.”

काजाेल लवकरच दिसणार ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात
काजाेलच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर काजोल लवकरच ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
इफ्फीसाठी निवडलेल्या ‘पल्याड’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित… आजवर १४ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात वाजला डंका

खुशखबर! अनिल कपूर आणि माधूरी दिक्षितच्या ‘जमाई राजा’ चित्रपटाला 32 वर्ष पुर्ण, झाल्याबद्दल रिमेकची तयारी…

हे देखील वाचा