Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने गुपचूप उरकले लग्न? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’

काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने गुपचूप उरकले लग्न? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’

बॉलिवूड अभिनेत्री काजोलची (Kajol) बहीण तनिषा मुखर्जी (Tanisha Mukerji) सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. मात्र तरी देखील ती तिच्या चाहत्यांमध्ये सतत चर्चेचा विषय बनत असते. परंतु जेव्हाही ती काही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करते तेव्हा अभिनेत्रीच्या चाहत्यांचे नक्कीच लक्ष असते. आता तनिषाचे काही फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. अभिनेत्रीने गुपचूप लग्न केले आणि ही बातमी कुणालाही कळू दिली नाही, असे नेटकऱ्यांचे मत आहे.

तनिषाने (Tanisha Mukerjee) इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचे पाय दिसत आहेत. तनिषाने पायाच्या बोटात जोडवी घातल्याचे फोटोवरून स्पष्ट होत आहे. भारतीय परंपरेनुसार केवळ विवाहित महिलाच पायाच्या बोटात जोडवी घालतात. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने गुपचूप लग्न केल्याचे चाहत्यांना वाटत आहे.

फोटोमध्ये तनिषाने दिसले जोडवी घातलेले
तनिषाच्या पोस्टवर चाहते उग्र कमेंट करत आहेत आणि तिला जोडवी घातल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आहे. अभिनेत्रीचे चाहते तिच्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि तिच्या लूक आणि पायांचे कौतुक करत आहेत. तनिषाला प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करताना पाहिले आहे.

तनिषा आयुष्याचा घेत आहे पुरेपूर आनंद
इंस्टाग्रामवर चार फोटो शेअर करत तनिषाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या पायाच्या बोटात वाळू आणि माझ्या आत्म्यात समुद्र! मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे, मी जगत आहे!” ही अभिनेत्री भरतकाम-विणकामाचे कौशल्यही सांगत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते प्रचंड प्रेम व प्रतिसाद देत आहेत.

तनिषाने निवडक चित्रपटांमध्ये केले आहे काम
डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोड नेम अब्दुल’ या चित्रपटात तनिषा शेवटची दिसली होती. ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोमधून ती खूप लोकप्रिय झाली. ‘सरकार’, ‘सरकार राज’, ‘टँगो चार्ली’ आणि ‘नील अँड निक्की’ यांसारख्या निवडक चित्रपटांमध्ये तिने आपले कौशल्य दाखवली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा