Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, व्हायरल फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, व्हायरल फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

आई होणं आणि मातृत्वाचा आनंद घेणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सुखद क्षण असतो. त्याचबरोबर ही त्यांच्यासाठी मोठी जबाबदारीही असते. काही महिला नोकरी करता करता आपल्या लहान बाळालाही सांभाळत असतात. हे त्यांच्यासाठी तितकेच कठीण काम असते. असाच अनुभव सिनेजगतातील अभिनेत्रींनाही येत असतात. सध्या अभिनेत्री कल्कि कोचलिनचाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

कल्कि कोचलिन (kalki koechlin) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या आव्हानात्मक भूमिकांसाठी तसेच अभिनयासाठी ती  सिने जगतात विशेष प्रसिद्ध आहे. आपल्या अभिनयासाठी तर ती ओळखले जातेच त्याचबरोबर ती आपल्या रोखठोक भूमिकांसाठीही ओळखली जाते. अनेक सामाजिक मुद्यावर तसेच महिलांसाठी ती नेहमीच आवाज उठवताना दिसत असते. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामधून तिने मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

कल्किने हा फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये कल्कि तिच्या रुममध्ये बसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर आजूबाजूला शूटिंगचीही तयारी सुरू आहे. परंतु सगळ्यात लक्षवेधक गोष्ट म्हणजे कल्किच्या फोटोमध्ये नीट पाहिल्यास कल्किच्या ब्रेस्टला पंपिंग मशिन लावल्याचे दिसत आहे. या मशीनच्या साहाय्याने ती ब्रेस्ट मिल्क काढत आहे. तिचा हाच व्हायरल फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalki (@kalkikanmani)

 

कल्किच्या या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला खंबीर आई असल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी महिलांच्या या धाडसाचे हिमतीला दाद द्यावी लागेल असे म्हणले आहे. दरम्यान कल्किने अनुराग कश्यपसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कल्किने बॉयफ्रेंड गाई हर्शबर्गसोबत रिलेशनमध्ये आहे.

हेही वाचा –

बाप रे ! अजगर गळ्यात घालून नोरा फतेहीचा भयान व्हिडिओ व्हायरल

‘बॉलिवूडमध्ये तुझी माझ्याशी तुलना केली जाईल’, कोणत्या अभिनेत्रीबाबत श्रीदेवीने केली होती भविष्यवाणी

शाहरुख खानच्या ‘त्या’ वागण्याने भडकले नेटकरी; पण आर्यन खानचं का होतंय कौतुक? एकदा वाचाच

हे देखील वाचा