Wednesday, July 3, 2024

मोठी बातमी! कंगना रणौतच्या बॉडीगार्डला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता तिच्याशी संबंधित व्यक्तीसुद्धा या वादविवादांचा भाग बनले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कंगनाचा वैयक्तिक बॉडीगार्ड कुमार हेगडेविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याखाली एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी कुमारला अटक केली आहे. हेगडेला कर्नाटक येथील त्याच्या गावातून अटक केली आहे.

खरं तर मुंबईच्या के डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये एका ब्यूटीशियन महिलाने बॉडीगार्ड कुमारविरुद्ध आरोप लावला होता की, त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा बलात्कार केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, “मुंबई पोलिसांच्या एका टीमने कुमार हेगडेला मांड्या येथील हेगडाहल्लीमधून अटक केली आहे.” एफआयआरनुसार, पीडिता मागील वर्षी जूनमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कुमार हेगडेला भेटली होती. आरोपीवर भारतीय दंड संहितेनुसार कलम ३७६, ३७७ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलीस पुढील तपास करत आहेत.

तक्रारीत महिलेने सांगितले की, त्याने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केल्यानंतर कुमारने तिला प्रवृत्त केले. पीडितेने असेही आरोप लावले की, कुमारने त्याची आई आजारी आहे सांगून घरी जाण्यासाठी तिच्याकडून ५० हजार रुपये घेतले. तेव्हापासून तो तिच्या संपर्कात नाहीये.

महिलेने पुढे सांगितले की, आठ वर्षांपूर्वी ती आरोपीच्या संपर्कात आली होती. मागील वर्षी जून महिन्यात आरोपीने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. यानंतर त्याने तिचा बलात्कार केला. दुसरीकडे, जेव्हा कंगनाच्या टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी इतकेच सांगितले की, कुमार दीर्घ काळापासून सुट्टीवर आहे. याबाबत त्यांना कोणतीही अधिक माहिती नाहीये.

हे देखील वाचा