‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. भारताला सन १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला ‘भीक’ सांगून कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. याबाबत नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले असता, अभिनेत्रीने आपला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याचे वक्तव्य केले. मात्र, हा सन्मान परत करताना तिने काही प्रश्नांचा भडीमारही केला आहे. तिने म्हटले आहे की, जर तिने सांगितलेली गोष्ट चुकीची ठरली, तर ती पुरस्कार परत करण्यासोबतच माफीही मागेल. यानंतर आता पुन्हा एकदा कंगनाने भारताच्या फाळणीवर प्रश्न उपस्थित करत भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
कंगनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे की, “जर इंग्रजांनी गुन्हा केला होता, तर आपण कोणती तक्रार दाखल केली का? ज्यांनी देशाची फाळणी केली, आपण त्यांच्याविरुद्ध काही पाऊले उचलली का?” (Actress Kangana Ranaut Now Raised Question On Partition of India Says We Are Disrespecting The Freedom Fighters)
ब्रिटीश भारतासाठी कोणतीही परतफेड करत नाही
कंगनाने ब्रिटीश माध्यम संस्था बीबीसीच्या सन २०१५ मधील एका लेखाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कंगनाने त्यासोबतच लिहिले आहे की, “२०१५ मध्ये बीबीसीने प्रकाशित केलेला हा लेख आहे, ज्यात युके भारताला कोणतीही भरपाई देत नाही असा युक्तिवाद करतो. आता मला सांगा आजच्या काळात हे पांढरपेशा वसाहतवादी किंवा त्यांचे सहानुभूतीदार अशा मूर्खपणापासून का आणि कसे दूर जाऊ शकतात? जर तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर उत्तर माझ्या टाईम्स नाऊ समिट स्टेटमेंटमध्ये आहे.” यामध्येच तिने स्वातंत्र्याला ‘भीक’ म्हटले होते.
इंग्रजांना अगणित गुन्ह्यांसाठी जबाबदार धरण्यात आले?
ते पुढे म्हणाले, “आपल्या राष्ट्रनिर्मात्यांनी भारतामध्ये आपल्या देशाची संपत्ती लुटण्यापासून ते आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची निर्घृण हत्या करण्यापर्यंत, आपल्या देशाचे दोन तुकडे करणे आणि स्वातंत्र्याच्या काळात केलेल्या असंख्य गुन्ह्यांसाठी इंग्रजांना जबाबदार धरण्यात आलेले नाही.”
स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करत आहोत!
कंगनाने तिच्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे की, “स्वतंत्र भारतासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना काय माहित होते की, ब्रिटीश आणि आमचे राष्ट्रनिर्माते अविभाजित भारताचे दोन तुकडे करतील. परिणामी दहा लाख लोकांची कत्तल होईल? शेवटी, मला हे सांगायचे आहे की, भारतात झालेल्या असंख्य गुन्ह्यांसाठी आपण जरी इंग्रजांना जबाबदार धरत नसलो, तरीही आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करत आहोत. जय हिंद.”
यापूर्वी कंगनाने ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याबाबत बोलताना म्हटले होते की, “मी मुलाखतीत सर्व काही स्पष्ट केले होते. सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांसारख्या महान लोकांच्या बलिदानाने १८५७ मध्ये स्वातंत्र्याचा पहिला सामूहिक लढा सुरू झाला. मला १८५७ ची लढाई माहित आहे, पण १९४७ मध्ये कोणते युद्ध लढले गेले ते माहित नाही. जर कोणी मला सांगू शकले, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेल आणि माफीही मागेल. कृपया यामध्ये मला मदत करा.”
तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगनाविरुद्ध देशातील अनेक भागात तक्रार दाखल करण्यात आली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘भीक’चे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगनाने शेअर केला तिचा ग्लॅमरस फोटो; म्हणाली, ‘एक गाणे…’
-कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकली राखी सावंत; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘गद्दार’