बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या पहिल्या भागाला जबरदस्त यश मिळाले. यानंतर बुधवारी (१९ मे) या सीरिजच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला आहे. ‘द फॅमिली मॅन २’ चा ट्रेलर पाहून आता ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतला दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीचे काम खूपच आवडले आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावरून तिचे कौतुक केले आहे.
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर ‘द फॅमिली मॅन २’ वेब सीरिजच्या ट्रेलरसचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यासोबतच तिने लिहिले आहे की, “या मुलीने माझे हृदय घेतले आहे.” या स्क्रीनशॉटमध्ये समंथाची सीरिजमधील भूमिका दिसत आहे. यासोबतच सबटायटलमध्ये ‘मी त्यांना मारून टाकेल (I Will Kill Them)’ असे लिहिले आहे.

कंगनाने केलेल्या प्रशंसेवर समंथानेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने कंगनाची इंस्टा स्टोरी हार्ट इमोजीसोबत शेअर केली आहे. समंथाने ही स्टोरी शेअर करत त्यावर ‘धन्यवाद’ असे लिहिले आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाची प्रशंसा करण्याची ही कंगनाची पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही तिने एप्रिलमध्ये समंथाला ‘एपिटोम ऑफ वुमेन एम्पावरमेंट’चा किताब दिला आहे. समंथानेही कंगनाचा आगामी चित्रपट ‘थलायवी’ची प्रशंसा केली आहे.
खरं तर ‘द फॅमिली मॅन २’ वेब सीरिज ऍमेझॉनवर ४ जून रोजी रिलीझ होणार आहे. ही एक ऍक्शन- ड्रामा सीरिज आहे, जी एका मध्यमवर्गीय व्यक्ती श्रीकांत तिवारीची कहाणी आहे. यासोबतच तो राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीच्या एका विशेष सेलसाठी काम करतो. या सीरिजमध्ये श्रीकांतचे कठीण आयुष्य दाखवले आहे. जिथे तो आपले गुपित, कमी उत्पन्न, अधिक दबावातील नोकरी आणि एक पती तसेच वडीलांच्या भूमिकेत संतुलन राखण्यासाठी संघर्ष करतो.
मनोज वाजपेयी आणि समंथा अक्किनेनीव्यतिरिक्त या वेब सीरिजमध्ये प्रियमणि, शारिब हाश्मी, सीमा बिस्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर यांचाही समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान










