जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने प्रत्येकाचे जीनव धोक्यात घातले आहे. भारतात तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. लाखो लोक संक्रमित होत आहेत, तर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशामध्ये समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं यासाठी अनेक दिग्गज मंडळी या कठीण काळात मदतीचा हात पुढे करत आहेत. काही कलाकार स्वखर्चातून मदत करत आहेत, तर काही कलाकार निधी गोळा करण्यासाठी नागरिकांना आवाहन करत आहेत. परंतु ‘पंगा क्वीन’ कंगना रणौतला ही गोष्ट खटकल्याचे दिसत आहे. तिने पुन्हा एकदा कलाकारांवर निशाना साधला आहे.
सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या बाबतीत आणि देशातील प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडण्यात कंगनाचा हात कोणीच पकडू शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कंगनाची ट्विटरवरून हाकालपट्टी केल्यानंतर आता ती इंस्टाग्रामवर सक्रिय राहते. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत, त्यामध्ये प्रियांका चोप्रा, विराट कोहली आणि अनेक कलाकारांवर निशाणा साधला आहे. जे कोव्हिड- १९ विरुद्धच्या लढाईसाठी निधी गोळा करत आहेत.
कंगनाने ५ मुद्द्यांमध्ये आपले मत मांडले आहे. तिने लिहिले की, “आजचा विचार, कदाचित हे काही लोकांसाठी थोडे कठीण होईल, पण काही लोकांना ही गोष्ट नक्कीच समजेल. महामारीने मिळालेले धडे.”
कंगनाने पहिला मुद्दा स्पष्ट करत लिहिले की, “कोणीही महत्त्वहीन नाहीये. प्रत्येकजण मदत करू शकतो, परंतु हे समजून घेणे गरजेचे आहे की, तुमचे समाजातील स्थान, भूमिका आणि प्रभावित करण्याची ओळख काय आहे?” यानंतर तिने आपल्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटले की, “जर तुम्ही श्रीमंत असाल, तर गरिबांना भीक मागू नका.” तिसऱ्या मुद्द्यामध्ये ती सांगते, “जर तुम्ही लोकांसाठी औषधे, ऑक्सिजन आणि बेडची व्यवस्था करू शकता, तर यामुळे अनेकांचा जीव वाचू शकतो.”
कंगनाने आपल्या चौथ्या मुद्द्यात म्हटले की, “तुम्ही नामांकित व्यक्ती असाल, तर काही लोकांच्या मागे धावू नका. जे लाखोंना वाचवू शकतात, त्यांना योग्य वातावरण आणि पाठिंबा देऊन त्यांना वाचवा.” पुढे तिने आपला पाचवा मुद्दा मांडत म्हटले की, “जर ती शक्ती अब्ज लोकांना बेड, ऑक्सिजनच्या समस्येतून एका आठवड्यात दूर करू शकतात, तर आपले योगदान देण्यास विसरू नका. जरी ती छोटी मदत का असेना, आपले योगदान नक्की द्या. सर्वांना आपल्या भावनेची जाणीव नसते. कारण काही लोक केवळ नाटक करतात आणि काही लोक केवळ काळजी. लव्ह कंगना.”
कंगनाने दिली कोरोनाला मात
कंगनाला काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसची लागण झाली होती. याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. त्यानंतर आता कंगनाने कोरोनाला मात दिली आहे. नुकताच तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ही माहिती शेअर केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-