बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ कंगना रणौत आपल्या अभिनयासोबत अनेक वादविवादांनी देखील चर्चेत असते. शेतकरी आंदोलन असो किंवा राजकारणातील अनेक गोष्टी असो, ती परखडपणे तिची मते मांडताना दिसत असते. आता तिच्या चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट ‘थलायवी.’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तिच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी तिने काही बिहाईंड सीन सोशल मीडियावर शेअर केले होते. कंगनाने सांगितले की, या चित्रपटासाठी तिला 20 किलो वजन वाढवावे लागले आणि ते परत कमी देखील केले. हे सर्व करणे तिच्यासाठी खूप मेहनतीचे होत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, “थलायवी या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी मला 20 किलो वजन वाढवावे लागले होते आणि परत काही महिन्यातच मला ते कमी देखील करावे लागले होत. ही माझ्यासाठी एक खूप मोठी कसरत होती. जिचा सामना मी या इपिक बायोपिकच्या शूटिंग दरम्यान केला.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1373820957119279104
‘थलायवी’ हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची बायोग्राफी आहे. हा चित्रपट 23 एप्रिलला हिंदी, तमिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ए एल विजय यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 26 जून रोजी रिलीज होणार होत.
https://twitter.com/KanganaTeam/status/1316171019225194496
लॉकडाऊनमुळे 7 महिने या चित्रपटाची शूटिंग होऊ शकली नव्हती. 4 ऑक्टोबरला कंगनाने पुन्हा या चित्रपटाची शूटिंग सुरू केली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा
-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी