भारतातील वाढती लोकसंख्या हे आता प्रशासनापुढील मोठे आव्हान ठरले आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने संपूर्ण जनतेला सोयी सुविधा पुरवणे आता शासनाला अवघड जात आहे. हा मुद्दा घेऊन बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे. त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.
कंगना ही नेहमीच अनेक समाजिक प्रश्नांवर तिचे मत मांडताना दिसली आहे. याआधी देखील ती तिच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता देखील तसेच काहीसे चित्र बघायला मिळत आहे.
अभिनेत्री कंगना रणौत हिचे असे म्हणणे आहे की, “भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे खूप माणसांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे तिसरे अपत्य झाले, तर त्याच्या आई- वडिलांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना तुरुंगवास झाला पाहिजे.” यासोबतच कंगनाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे.
कंगनाने लिहिले आहे की, “इंदिरा गांधी या त्यावेळेस निवडणूक हरल्या होत्या आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली. कारण त्या याच मुद्याचा आधार घेऊन निवडणूक लढत होत्या.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1384525948046004224
कंगनाने केलेल्या या ट्विटमुळे ती सध्या चर्चेत आहे. तिच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे, तर काही तिचे हे म्हणणे न पटल्याने तिला ट्रोल करत आहेत.
याआधी देखील कंगणाने एक ट्वीट केले होते. हे ट्वीट तिने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उदेशून लिहिले होते. या आधी जेव्हा कुंभ मेळ्यात अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, तेव्हा मोदींनी ट्वीट करून ही माहिती सगळ्यांना दिली होती. त्यावेळी कंगनाने त्यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत ट्वीट केले होते की, “आदरणीय पंतप्रधान!! रमजान हा सण देखील जवळ आला आहे. रमजानच्या निमित्ताने देखील सगळेजण एकत्र येतात, तेव्हा त्यांना एकत्र येण्यापासून थांबवा.”
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तमिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि दिवगंत अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट २३ एप्रिलला सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.










