Tuesday, July 9, 2024

कलाकारांवर निशाणा साधणाऱ्या कंगनाने ‘बेबो’ करीनाला ‘अशा’प्रकारे दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान ही सध्या यशाच्या शिखरावर आहे. करीनाने आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. इतकेच नव्हे, तर तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांचे नेहमी मनोरंजन केले आहे. करीनाने अनेक कलाकारांसोबत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून तिने आपली जादू चाहत्यांवर कायम ठेवली आहे.

अभिनेत्री करीना कपूर ही मंगळवारी (२१ सप्टेंबर) आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या करीना अभिनेता सैफ अली खानसोबत मालदीव आहे. त्याचबरोबर तिची दोन मुलं तैमूर आणि जहांगीर हे देखील आहे. करीना मालदीवमधील फोटो देखील शेअर करत आहेत. तर करीनाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह कलाकारांकडूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (actress kangana ranaut wishes kareena kapoor khan on her birthday see post)

निर्माता करण जोहरपासून तिची बहीण करिश्मा कपूरपर्यंत सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या सर्वांमध्ये एका व्यक्तीने करीनाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची क्वीन म्हणजेच कंगना रणौत आहे. कंगनाने विशेष मजकुरात तिला शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना ही नेहमीच स्टार किड्सवर निशाणा साधत असते. मात्र तिने करीनाला सर्वात सुंदर अभिनेत्री अशी उपमा दिली आहे.

काय लिहिलंय कंगनाने?
कंगनाने करीनाच्या फोटोंचे कोलाज केले असून, तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. त्याचबरोबर लिहिले की, “सर्वात सुंदर करीना कपूर खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” यासोबतच कंगनाने हार्ट इमोजी देखील टाकले आहे.

तर दुसरीकडे, बहीण करिश्माने लिहिले की, “नेहमी तुझ्यासोबत राहील… जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… माझी जीवनरेखा… तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम.” त्याचबरोबर करिश्माने या पोस्ट सोबतच करीनाचे लहानपणीचे फोटो देखील शेअर केले आहे.

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतला एक चित्रपटासाठी भगवान श्री राम यांची पत्नी सीता मातेच्या भूमिकेची ऑफर मिळाली आहे. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून या भूमिकेसाठी करीनाच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता ही भूमिका कंगनाला देण्यात आली आहे. असे म्हटले जात होते की, करीनाने या भूमिकेसाठी तब्बल १२ कोटी मानधन मागितले होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने पती सैफ अली खानसोबत एक सुंदर फोटो देखील शेअर केला आहे. तिने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहेत. ज्यात दोघांची क्यूट केमिस्ट्री दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त, करीना तिच्या लहान मुलाच्या नावाबद्दल मागील काही दिवसांपूर्वी बरीच चर्चेत होती. लहान मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली होती.

करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता आमिर खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा