Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

करीनासाेबत कामावर गेला तिचा लाडका जेह; मायलेकाच्या जाेडीवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव

बॉलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री करीना कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, पण सध्या ती एका फाेटाेमुळे चर्चेत आहे. करीना तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. जिथून ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मने जिंकत आहे. दरम्यान, करीनाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री आणि तिचा मुलगा जहांगीर अली खान म्हणजेच जेहसोबत पोज देताना दिसत आहे.

फोटोमध्ये करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने पांढर्‍या रंगाची हुडी आणि हलक्या निळ्या रंगाचा डेनिम्स परिधान केला असून पांढऱ्या रंगाचा शूज घातला आहे. जेह (Jehangir Ali Khan) विषयी बाेलायचे झाले, तर जेहने काळ्या रंगाचा स्वेटर, पँट आणि शूज परिधान केला आहे, ज्यात ताे खूपच गोंडस दिसत आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये करीनाने जेहचा हात पकडलेला आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये जेह त्याच्या आईप्रमाणे पोज देताना दिसत आहे. मायलेकाची ही जोडी हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये फिरताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या मुलासोबत काम करण्यासाठी… पण निघण्यापूर्वी एक झटपट पोज… #जे बाबा #कामावर चला…”

करीनाच्या पोस्टवर तिचे चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. चाहत्यांसोबतच बॉलिवूड स्टार्सही मायलेकाच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आलिया भट्टने कमेंट करून दोघांनाही ‘सुपरस्टार’ म्हटले आहे. त्याचवेळी आलियाची आई सोनी राजदान हिने या फोटोवर शानदार कमेंट केली आहे. यासोबतच करिश्मा कपूर, सबा पतौडी यांच्या व्यतिरिक्त अनेकांनी करीनाच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजीसह प्रेमाचा वर्षाव केला आहे.

करीना लंडनमध्ये हंसल मेहताच्या क्राईम थ्रिलरचे शूटिंग करत आहे. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तानुसार करीनाचा आगामी चित्रपट ‘मर्डर मिस्ट्री’ आहे, ज्यामध्ये अभिनेत्री एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. एकता कपूर हिने बालाजी मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी टीव्ही इंडस्ट्रीला ठोकला रामराम, पंजाबी अन् बॉलिवूड इंडस्ट्रीत करणार पदार्पण

पत्नीनेच उघडला शालिनचा खोट्या चेहऱ्याचा मुखवटा; म्हणाली, ‘मी तुझी बेस्ट फ्रेंड….’

हे देखील वाचा