Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड ‘सैफीना’ने कुटुंबासह साजरा केला गणेशोत्सव, तर चिमुकल्या तैमुरने आपल्या हाताने बनवले ‘लिटिल गणेशा’

‘सैफीना’ने कुटुंबासह साजरा केला गणेशोत्सव, तर चिमुकल्या तैमुरने आपल्या हाताने बनवले ‘लिटिल गणेशा’

देशभरात आज गणेश चतुर्थी साजरी केली जाते. प्रत्येकजण या खास प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा देत आहे. या दिवशी बरीच लोक आपापल्या घरी गणेश जीच्या मुर्तीची स्थापना करतात. या खास प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही तिच्या घरी गणेश जीची मूर्ती बसवली आहे. हे फोटो शेअर करत करीनाने तिच्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते. गणेश चतुर्थीच्या निमित्तानेही करीनाने तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सैफ-करीना आणि त्यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान गणेश जीची पूजा करताना दिसत आहेत. (actress kareena kapoor khan shares clay ganesha made by taimur ali khan and wishes fans happy ganesh chaturthi)

करीना कपूर खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, सैफ आणि करीनाच्या घरी गणेश जीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच यात सैफ आणि तैमूर देवासमोर हात जोडून उभे आहेत आणि पूजा करत आहेत. करीनाने यासोबत एक खास फोटो शेअर केला आहे.

करीनाने शेअर केलेला खास फोटो म्हणजे, ‘क्यूट लिटल गणेश’चा फोटो होय. जो सैफ-करीनाचा मोठा मुलगा तैमूरने स्वतः बनवला आहे. मातीपासून बनवलेला हा छोटासा गणपती अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आयुष्यातील प्रेमासोबत गणेश चतुर्थी साजरी करत आहे आणि टिम टिमने लहान गोंडस मातीचा गणपती बनवला आहे. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.”

महत्त्वाचे म्हणजे, इतर सेलिब्रिटींप्रमाणे करीना कपूर खान देखील दरवर्षी तिच्या घरी गणेश मूर्तीची स्थापना करते. करीना तिच्या कुटुंबासह घरी एक लहान प्रतिमेची स्थापना करते. शिवाय अभिनेत्री शांततेत स्थापना आणि पूजा करणे पसंत करते.

हे देखील वाचा