Wednesday, July 3, 2024

चिमुकल्या जहांगीरला कडेवर घेऊन करीनाने शेअर केला गोड फोटो; बिकिनीमध्ये दिसली पतौडी घराण्याची सून

अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान त्यांच्या चित्रपटांसह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही अनेकदा चर्चेत येत असतात. बेबोने अलीकडेच तिचे ‘प्रेग्नन्सी बायबल’ हे पुस्तक लाॅच केले आहे. ज्यात तिने तिच्या प्रेग्नन्सीमधील दिवसांची सर्वं माहिती दिली आहे. या पुस्तकात तिचा छोटा मुलगा जहांगीरच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तेव्हापासून करीना सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या ती पती सैफ अली खान, मोठा मुलगा तैमूर आणि जहांगीरसोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहे. या सुट्टीतील काही फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

करीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तसेच अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. नुकताच तिने जहांगीर सोबतचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे चिमुकल्या जहांगीरला ६ महिने पुर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे. करीनाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीले की, “प्रेम, आनंद, सुख आणि धैर्य नेहमीच तुला मिळेल. ६ महिन्यांसाठी हार्दिक शुभेच्छा.” यासोबत करीनाने हार्ट ईमोजी ही पोस्ट केल्या आहेत. करीनाने हा फोटो तिच्या सोशल मीडियावर अकाउंट वरुन शेअर केला आहे.

या फोटोमध्ये करीनाने गुलाबी आणि काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तसेच तिने जहांगीरला कडेवर घेतले आहे. फोटोमध्ये जहांगीरने डोळे झाकले आहेत. करीनाच्या या फोटोला काही क्षणातच १ लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. करीनाचे चाहते जहांगीरवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान तिने सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्त देखील एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोलाही चाहत्यांनी प्रचंड प्रेम दर्शवले.

सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, तो लवकरच ‘भूत पोलिस’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तर करीना आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा