अभिनेत्री करिश्मा शर्मा ही बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. ती ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स वेब सीरीज’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘हॉटेल मिलन’, ‘सुपर ३०’, ‘उजदा चमन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. करिश्मा बुधवारी (२२ डिसेंबर) तिचा २८वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तिच्या वाढदिसानिमित्त तिच्याशी संबधित काही खास गोष्टी जाणून घेऊया आणि करिश्माचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो पाहूया.
करिश्मा (Karishma Sharma) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो टाकताच चाहते त्यांचे भान हरपून बसतात. याच कारणामुळे ती सतत चर्चेत असते.
या फोटोत तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि जांभळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये करिश्मा खूपच सुंदर दिसत आहे. त्यासह तिने गॉगल लावला असून, हिल्स शूज घातला आहे. तिने उभी राहून एक बोट वर करत सुंदर अशी पोझ दिली आहे. त्याचबरोबर तिच्या हातात बॅट देखील दिसत आहे. तिचा हा स्टायलिश अंदाज पाहून कोणालाही वेड लागेल.
करिश्माची हॉट स्टाईल सगळ्यांनाच आवडते आणि ती अनेकदा तिच्या हॉट स्टाईलमुळे चर्चेचा विषय बनते. ती सतत स्टायलिश कपडे परिधान करून भन्नाट पोझ देत असते. तिच्या एका कातील नजरेने लाखो चाहते घायाळ होतात.
बिकिनीमध्ये तर करिश्मा कमाल सुंदर दिसते. तिने एक बिकिनीतील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिने फिकट जांभळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ती झोपलेली दिसत असून, कोवळ्या उन्हाचा आनंद घेताना दिसत आहे. करिश्मा बिकिनीमध्ये कहर करत आहे.
करिश्मा तिच्या बोल्ड फोटोशूटसाठी अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येते आणि तिने असे अनेक फोटोशूट केले आहेत जे सेक्सी आणि बोल्ड आहेत. या फोटोत ब्लू आउटफिटमध्येही करिश्मा शर्मा खूपच स्टायलिश दिसत आहे. आणखी एका फोटोत करिश्मा पूलमध्ये चील करताना दिसत आहे. या फोटोंसाठी करिश्मा शर्माचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
हेही वाचा :