Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

क्या बात है! करिश्मा तन्नाने केला साखरपुडा, पण कोण आहे तो व्यक्ती? घ्या जाणून

मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकार जोडप्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये रणबीर कपूर- आलिया भट्ट, विकी कौशल- कॅटरिना कैफ, राजकुमार राव- पत्रलेखा यांचा समावेश आहे. दुसरीकडे छोट्या पडद्यावरीलही काही कलाकार लग्नबंधनात अडकण्यास तयार आहेत. यामध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नाचा समावेश आहे. करिश्मा सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. तसेच, ती आयुष्याचा भरपूर आनंद लुटत आहे. काही महिन्यांपूर्वी असे वृत्त आले होते की, करिश्माला कुणीतरी भेटलं आहे आणि ती लवकरच आपला संसार थाटण्याची योजना बनवत आहे. अशातच आता म्हटले जात आहे की, अभिनेत्रीने एका रिअल इस्टेट व्यावसायिक वरुण बंगेराला डेट करत होती. आता त्याच्यासोबत करिश्माने साखरपुडा केला आहे.

वरुणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर करिश्मासोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. तसेच, अभिनेत्रीनेही केकचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर अभिनंदनाचा संदेश लिहिला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, हा साखरपुडा फक्त कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत झाला होता. (Actress Karishma Tanna Engaged With Boyfriend Varun Bangera Will The Couple Get Married Soon)

करिश्मा आणि वरुण यांची भेट त्यांच्या एका कॉमन फ्रेंड सुवेद लोहियाच्या माध्यमातून झाली आणि तेव्हापासून त्यांचे नाते घट्ट होत गेले. करिश्मा आणि वरुण गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. एकत्र सुट्टी घालवण्यापासून ते एकमेकांसोबत वेळ घालवण्यापर्यंत हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहे. ते लवकरच लग्न करू शकतात.

यावर्षी ऑगस्टमध्ये अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड वरुणसाठी बर्थडे पार्टी ठेवली होती. वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्याच्या सर्व जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. याआधी, करिश्मा पर्ल व्ही याला डेट करत असल्याच्या अफवा होत्या. दोघे काही काळापूर्वी वेगळे झाले आणि अजूनही चांगले मित्र आहेत.

करिश्मा शेवटची ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटात दिसली होती. तिने या चित्रपटात ‘बसंती’ हा स्पेशल डान्स नंबर केला होता, ज्याचे सर्वांनी कौतुक केले होते. अभिनेत्री ‘नच बलिये’, ‘बिग बॉस ८’, ‘झलक दिखला जा’ सारख्या काही मोठ्या रियॅलिटी शोचा भाग देखील आहे. ती ‘खतरों के खिलाडी १०’ची विजेती ठरली आहे. करिश्माने यापूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात भेटलेल्या उपेन पटेलला डेट केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करण जोहरने आलिया भट्टसोबत खेळला मजेदार रॅपिड फायर राऊंड, अभिनेत्रीनेही दिली धमाकेदार उत्तरे

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

हे देखील वाचा