Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बोल्ड एँड ब्युटीफुल! करिश्मा तन्नाने शेअर केला हॉट फोटो, चाहत्यांसोबतच कलाकारांनाही पाडला कमेंट्सचा पाऊस

बॉलिवूडप्रमाणेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीही आपल्या हॉट लूकमुळे चर्चेचा विषय ठरतात. चर्चेत असलेल्या अभिनेत्रींमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्नाचाही समावेश आहे. अभिनयाव्यतिरिक्त करिश्मा सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिचे हॉट फोटो ती नेहमी शेअर करत असते. तिचा चाहतावर्ग इतका मोठा आहे की, तिने फोटो शेअर करताच, तिचे फोटो व्हायरल होऊ लागतात. अशातच आता तिने आपल्या फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचे फोटो पाहता क्षणीच, तिचे चाहते पुरते फिदा झाले आहेत.

हॉट अंदाजाने जिंकले चाहत्यांचे हृदय
फोटोत करिश्मा तपकिरी ब्लेझर आणि ट्राऊझर्समध्ये दिसत आहे. तिने ब्रा घातलेली नाही. तिने ब्राशिवाय ब्लेझर घातले असून ब्लेझरचे बटण लावलेले नाही. यासोबतच तिने गळ्यात चोकर घातला आहे. करिश्मा तन्नाची ही बोल्ड स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. तिने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो क्लिक केले आहेत. चाहते करिश्माच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत. (Actress Karishma Tanna Wears Open Blazer Without Bralette Bold Photos Viral On Social Media)

करिश्माने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “बेबी बेबी बेबी ओह…,” असे लिहिले आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हिना खाननेही कौतुक केले
टीव्ही अभिनेत्री हिना खान देखील करिश्मा तन्नाचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. कमेंट करताना तिने “छान,” असे लिहिले. तसेच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही कमेंट करत “तू थक्क करणारी आहेस,” असे म्हटले आहे. याशिवाय चाहते करिश्माच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. करिश्माचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे.

हे देखील वाचा