Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन २’च्या सेटवर करिश्माने केला जबरदस्त डान्स, पाहून थिरकतील तुमचेही पाय!

‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन २’च्या सेटवर करिश्माने केला जबरदस्त डान्स, पाहून थिरकतील तुमचेही पाय!

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध डान्स रियॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन २’ च्या जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये सेलिब्रिटींची मस्ती पाहायला मिळते. प्रत्येक वेळेप्रमाणेच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’चा आगामी एपिसोड संपूर्ण मनोरंजनाने असेल. कारण या शोमध्ये तुम्हाला ९० च्या दशकातील सुपरहिट करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टीची जोडी पाहायला मिळणार आहे, जी गेस्ट शोमध्ये पोहोचली आहे. या डान्स रियॅलिटी शोमध्ये सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूरच्या जबरदस्त मस्तीशिवाय मलायका अरोरा आणि करिश्मा कपूरही जबरदस्त डान्स करताना दिसणार आहेत. शोमध्ये करिश्मा कपूर मलायकाच्या ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. तर मलायका करिश्माच्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरताना दिसणार आहे.

करिश्मा आणि मलायकाने स्टेजवर केला डान्स
प्रसिद्ध डान्स रियॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन २’चा आगामी भाग खूप रंजक असणार आहे. या एपिसोडमध्ये पहिल्यांदाच ९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर करिश्मा आणि सुनील शेट्टीची जोडी धमाल करताना दिसणार आहे. तर तुम्हाला सुंदर आणि गॉर्जियस अभिनेत्री मलायका अरोरा आणि कपूर कुटुंबाची लाडकी करिश्माचा धमाकेदार डान्स देखील पाहायला मिळेल.

सोनी एंटरटेनमेंटच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलेल्या शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आगामी शो किती मनोरंजक असेल याची काही झलक पाहता येईल. या प्रोमोमध्ये मलायका अरोराने करिश्माच्या ‘हुस्न है सुहाना’ या सुपरहिट गाण्यावर अप्रतिम डान्स केला. तर करिश्मा मलायकाच्या सुपरहिट आयटम साँग ‘मुन्नी बदनाम हुई’वर जबरदस्त डान्स करताना दिसली. मंचावर दोन्ही सुंदर अभिनेत्रींनी आपल्या पर्फोर्मेंसने आग लावली.


करिश्माने बेबोच्या लग्नाचा सांगितला रंजक किस्सा
यादरम्यान करिश्मा कपूरने बेबोच्या लग्नाचा एक रंजक किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे. करिश्माने सांगितले की, करीनाच्या लग्नाच्या वेळी जेव्हा सगळे डान्सचा सराव करत होते आणि हसत-मस्करी करत होते, तेव्हाही मलायका इतक्या गंभीरपणे डान्स प्रॅक्टिस करत होती. मलायकाला भारतातील सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर असल्याचे सांगताना करिश्मा म्हणाली की, “आम्ही मस्ती करण्यात व्यस्त होतो, तर मलायका आम्हाला योग्य पद्धतीने डान्स स्टेप्स सांगण्यात व्यस्त होती.” हा किस्सा ऐकून कोरिओग्राफर गीता कपूर आणि टेरेन्स लुईसने सहज अभिनेत्रीसोबत सहमती दर्शवली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल

हे देखील वाचा