Tuesday, July 9, 2024

कॅटरिना कैफने सलमान खानवर लावले ‘हे’ आरोप, अभिनेत्याची प्रतिक्रियाही होती बघण्यासारखी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या तिच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्ताने ती अलीकडेच ‘बिग बॉस १५’मधील ‘विकेंड का वार’मध्ये पोहोचली होती. अभिनेत्रीसोबत दिग्दर्शक रोहित शेट्टीही दिसला. कलर्स टीव्हीच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये कॅटरिना गेमदरम्यान सलमानवर काही आरोप करताना दिसत आहे.

समोर आलेल्या या प्रोमोमध्ये कॅटरिना रोहितसोबत स्टेजवर दिसत आहे. एका गेममध्ये ती आणि सलमान एका टेबलाजवळील खुर्चीवर समोरासमोर बसतात, ज्यामध्ये रोहित जजची भूमिका साकारतो. यावेळी कॅटरिना सलमानवर आरोप करते की, “हा शूटवर नेहमीच दुरून येतो.” तेव्हा सलमान हा आरोप मान्य करतो. (actress katrina kaif alleged allegation during game and salman accept it and actor show some funny dance moves)

खास अंदाजात गायलं गाणं
आरोप मान्य केल्यानंतर, कॅटरिना म्हणते की, “सलमानला माझ्यासाठी एक गाणं गावं लागेल. मग सलमान खान त्याच्या मजेदार डान्स मूव्ह्ज दाखवत ‘ओ मेरे दिल के चैन’ हे गाणं गातो. जे ऐकून सगळेच हसू लागतात.

कॅटरिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने ‘विकेंड का वार’मधील ग्लॅमरस सुंदर लूकचे काही फोटो देखील शेअर केली आहेत. इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज बिग बॉसवर आणि ५ नोव्हेंबरला ‘सूर्यवंशी’ सिनेमागृहात.”

‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम
कॅटरिना आणि सलमानने २०१९ मध्ये आलेल्या ‘भारत’ चित्रपटासह, आणखी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘मैने प्यार क्यूं किया, आणि ‘हॅलो’ यांचा समावेश आहे. कॅटरिनाच्या २०१८ मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात सलमानने स्पेशल डान्स नंबरही केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निलेश साबळेचा होणार पत्ता कट, ‘ही’ अभिनेत्री करणार ‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रसंचालन?

-शिव ठाकरे अन् जुईली वैद्यच्या डान्सवर टायगर श्रॉफही झाला फिदा, कमेंट करत म्हणाला…

-भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री

हे देखील वाचा