Friday, December 5, 2025
Home बॉलीवूड सलमान अन् कॅटरिनानं सुरू केली ‘टायगर ३’ चित्रपटाची शूटिंग; ‘हा’ अभिनेता दिसणार व्हिलनच्या भूमिकेत

सलमान अन् कॅटरिनानं सुरू केली ‘टायगर ३’ चित्रपटाची शूटिंग; ‘हा’ अभिनेता दिसणार व्हिलनच्या भूमिकेत

सुपरस्टार सलमान खानने आपल्या अभिनयाची सुरुवात १९८८ मध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपतटातून केली होती. सुरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’मध्ये सलमानने मुख्य भूमिका साकारली आणि त्यानंतर सलमानने चित्रपटसृष्टीतील स्वत:चे एक वेगळेच स्थान निर्माण केले. सलमानला त्याचे चाहते ‘दबंग’ म्हणून ओळखतात. सलमानने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याने ‘टायगर’ चित्रपटाच कमालीची कामगिरी केली आहे. आगामी काळात त्याचा ‘टायगर ३’ चित्रपट येणार आहे. त्याचबरोबर सलमानसोबत मुख्य भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‌

सलमान आणि कॅटरिना चित्रपटाच्या शूटिंगसाठी शुक्रवारी (२० ऑगस्ट)ला रशियाला गेले आहेत. दरम्यान चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाली आहे. अगदी दिमाखात हे शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘टायगर ३’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते‌. मुंबईतील शूटिंग संपवून सलमान, कॅटरिना आणि दिग्दर्शक मनीष शर्मासह सर्व टीम रशियाला रवाना झाली आहे. (Actress Katrina Kaif And Salman Khan Begins Tiger 3 Shoot In St Petersburg)

माध्यमांतील वृत्तानुसार, ‘टायगर ३’चे शूटिंग पीटर्सबर्ग येथे चालू आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कोणताही अडथळा येऊ नये म्हणून रशियाचे प्राधिकरण विषेश काळजी घेत आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालण केले जात आहे.

तसेच आदित्य चोप्राने सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे अनेक नियम घालण्यात आले आहेत. तरीही हा चित्रपट कोणत्या नियमांबाबत तडजोड करणार नाही. मात्र, हा चित्रपट सुंदर कथेवर आधारित आहे. रशियातील शूटिंग संपवून सर्व कलाकार मंडळी लवकरच तुर्की आणि ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत.

अभिनेता इमरान हाश्मी सलमान खानच्या विरुद्ध भूमिकेत दिसणार आहे. इमरान पहिल्यांदाच सलमान आणि कॅटरिनासोबत काम करताना दिसणार आहे. तसेच ‘टायगर ३’ चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चाहत्यांचे सर्व लक्ष आता या आगामी चित्रपटाकडे लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अपना टाइम आएगा’ म्हणत राणीने चॅटर्जीने शेअर केला व्हिडिओ; नेटकरी म्हणतायेत, ‘अजून किती बारीक व्हायचंय’

-एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’

-अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

हे देखील वाचा