बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल ९ डिसेंबर, २०२१ रोजी विवाह बांधनात अडकले होते. यानंतर, थोड्या दिवसातच कॅटरिना जणू एकदम गायबच झाली. ती करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसाची पार्टी किंवा इतर कोणत्याही पार्टीत दिसली नाही. कॅटरिनाने इंस्टाग्रामवर काही आठवड्यांपूर्वी ‘फोन भूत’ या सिनेमाचं पोस्टर पोस्ट केलं होतं. कॅटरिना एकदमच गायब झाली आहे याकडे लोकांचंही लक्ष जात आहे.
कॅटरिना आहे प्रेग्नंट?
माध्यमांतील वृत्तांनुसार, कॅटरिना कैफ हिच्या अचानक गायब होण्याने चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. अनेकजण म्हणत आहेत की, ‘ती प्रेग्नंट आहे.’ तसेच, काहींचे असेही म्हणणे आहे की, ‘बहुदा कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लवकरच आई-बाबा होणार आहेत.’
वाढदिवशी करणार गोड बातमीची घोषणा
कॅटरिनाच्या एका चाहत्याने म्हटले आहे की, ती आपल्या प्रेग्नंसीची घोषणा तिच्या वाढदिवदिवशी म्हणजेच १६ जुलैला करू शकते. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, बहुतेक या कारणामुळेच कॅटरिनाने यावेळी करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये जाण्यास नकार दिला असावा.
कॅटरिनाचे आगामी चित्रपट
कॅटरिना कैफ हिने सन २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बूम’ या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर तिने ‘हमको दीवाना कर गये’, ‘अपने’, ‘पार्टनर’, ‘वेलकम’, ‘रेस’, ‘सिंग इज किंग’, ‘युवराज’, ‘न्यूयॉर्क’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केले.
तिच्या सिनेमांबाबत बोलायचं झालं, तर कॅटरिना अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत शेवटची ‘सूर्यवंशी’ या सिनेमात दिसली होती. आता ती तिचा पुढचा सिनेमा ‘फोन भूत’मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत दिसणार आहे. हा सिनेमा ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यासोबतच प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत ती, ‘जी ले जरा’ या सिनेमात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शमशेरा माझ्यासाठी भयानक स्वप्न’, अभिनेता रणबीर कपूरचे त्याच्याच सिनेमाबाबत खळबळजनक वक्तव्य
‘बिग बॉस’सारख्या शोचा विचार करूनही मला उलटी येते, कविता कौशिकच्या वक्तव्याने उडाली खळबळ
नव्वदच्या दशकातील होती ‘ती’ प्रसिद्ध अभिनेत्री, मग रातोरात चित्रपटातून काढता पाय घेण्याचे कारण काय?