Wednesday, July 3, 2024

आई बनणारंय कॅटरिना कैफ! ‘या’वरून लावला जातोय अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. कॅटरिना शेवटची करण जोहरच्या (Karan Johar) वाढदिवसाच्या पार्टीत दिसली होती, त्यानंतर ती कुठेही दिसली नाही. एवढेच नाही, तर ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत स्वतःबद्दल काही पोस्ट करत नाहीये. अशा परिस्थितीत, आता चाहते अभिनेत्रीबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावत आहेत. कॅटरिना कैफ लवकरच आई होणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

वास्तविक, एका न्यूज पोर्टलने चाहत्यांना कॅटरिना कैफशी संबंधित प्रश्न विचारला होता. चाहत्यांना विचारण्यात आले की, कॅटरिना कैफ लाइमलाइटपासून दूर का असेल? यावर चाहत्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक चाहत्यांनी कॅटरिना कैफ आई होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. एका चाहत्याने लिहिले की, “कदाचित ती गर्भवती आहे आणि तिला विश्रांतीची गरज आहे.” दुसर्‍याने लिहिले की, “कॅटरिना प्रेग्नंट आहे आणि लवकरच ती तिच्या प्रेग्नेंसीचीही घोषणा करणार आहे.” (actress katrina kaif pregnant know what netizens says)

कॅटरिना कैफने २८ जून रोजी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली होती. अभिनेत्रीने तिच्या आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. यानंतर कॅटरिनाची एकही पोस्ट समोर आलेली नाही. करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यानचा तिचा शेवटचा फोटोही अभिनेत्रीने शेअर केला आहे.

कॅटरिना कैफच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीकडे ‘फोन भूत’, ‘टायगर ३’, ‘जी ले जरा’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ यासह अनेक चित्रपट रिलीझ आहेत. ‘टायगर ३’ मध्ये कॅटरिना जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा