महादेव या सृष्टीचे निर्माता आहेत, असे मानले जाते. आपल्या भारतामध्ये अनेक हिंदू धर्मीय आहेत. त्यातील प्रत्येक व्यक्ती महादेवाची मनोभावाने पूजा करतात. यासह त्यांची वेगवेगळी रूपे आहेत. देवांच्या सर्व रूपांची त्यांचे भक्त मोठ्या श्रद्धेने अर्चना करतात. यामध्ये काही व्यक्ती देवावर एवढ्या अवलंबून राहतात की, प्रत्येक चांगल्या कामासह आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी देवाला दोषी ठरवतात. माणसाने स्वतः केलेल्या कर्माची फळे त्याला मिळणारच आहेत. यामध्ये त्याने जे पेरले आहे तेच उगवणार आहे, तरी देखील अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यातील वाईट प्रसंगांना देवांबरोबर जोडतात. यातीलच एक अभिनेत्री कविता कौशिक.
सध्या गणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बॉलिवूडमधील आणि टीव्ही वरील कलाकार देखील बाप्पाच्या सेवेत मग्न झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी कविताच्या आयुष्यात एक वाईट प्रसंग घडला होता. तिच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा पासून तिने विघ्नहर्ता गणपती बाप्पाची स्थापना करणे बंद केले होते. याविषयी तिने स्वतः एक पोस्ट शेअर करत याचा खुलासा देखील केला आहे. (Actress Kavita Kaushik on why she didn’t celebrate Ganesh chaturthi)
का रुसली होती गणपती बाप्पावर?
अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिले की, “साल २०१६मध्ये माझ्या वडिलांच्या निधनाने काही गोष्टी बंद झाल्या, त्यामुळे मी बाप्पाला घरी आणणे बंद केले. कदाचित मी महादेवाबरोबर भांडत होते की, तुम्ही माझ्या वडिलांना माझ्या पासून दूर केले. आता मी देखील तुमच्या मुलावर प्रेम नाही करणार. मी काहीतरी मिळवण्याची ती आग, तो उत्साह, ध्येय सर्व गमावून बसले होते. परंतु ज्या देवाने आपल्याला घडवले तो आपल्याला आयुष्यातील व्याधींमधून देखील बाहेर काढतो.”
पुढे देवाचे आभार मानत ती म्हणाली की,”जे काही माझ्या आयुष्यात प्रसंग ओढवले होते त्यासाठी मी देवाचे आभार मानू शकत नाही. मला कधी वाटले नाही की, जेवढं प्रेम माझ्या वडिलांनी माझ्यावर केले तेवढं दुसरं कोणी करू शकेल. आम्ही ५ वर्षांच्या ब्रेकनंतर बाप्पाला आमच्या नवीन घरी आणले आहे.”
अभिनेत्रीने टीव्ही वरील मालिकांमधून आपली एक वेगळी ओळख बनवलेली आहे. साल २००१ मध्ये आलेली मालिका ‘कुटुंब’मधून तिने अभिनयामध्ये पदार्पण केले. परंतु विनोदी कार्यक्रम ‘एफआयआर’ने तिला घराघरात पोहचवले. यामध्ये तिने तब्बल १० वर्ष काम केले. टीव्ही शोमधील सर्वात बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. सध्या ती ‘लक्ष्मी घर आई’मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण
-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा