Friday, July 5, 2024

केतकी माटेगावकर करणार मालिकेत पदार्पण? फोटोवरील चाहत्याची ‘ती’ कमेंट आली चर्चेत

‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोमधून एक गोड आवाजाची गायिका प्रसिद्ध झाली. केवळ गाण्यापुरते मर्यादित न राहता तिने अभिनयात देखील तिचे कौशल्य दाखवले आहे. हो अगदी बरोबर ओळखलंत! ही गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी केतकी माटेगावकर. केतकीच्या अभिनयाचा प्रवास ‘शाळा’ या चित्रपटापासून सुरू झाला. त्यानंतर ती अभिनयात आणि गायनात प्रगतीच करत राहिली. अनेक मालिकांसाठी तिने शीर्षक गीते गायली आहेत. तसेच अनेक चित्रपटात देखील गाणी गायली आहेत. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

केतकीने अलीकडेच सोशल मीडियावर तिचा एक स्विमिंग पूल शेजारी बसलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये केतकी नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच ड्रेसवर एक जॅकेट घातलेले दिसत आहे. या फोटोमध्ये ती सुंदर पद्धतीने पोझ देताना दिसत आहे.

तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर “लवकरच मालिकेत आगमन” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका चाहत्याने “कडक” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Actress Ketaki mategaokar share her photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुझ्या डोळ्यातील वादळ मला जास्त आवडते.” तिचा या फोटोला आतापर्यंत ४५ हजारापेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.

केतकीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘बालगणेश’, ‘तानी’, ‘टाईमपास २’, ‘वाय झेड’, ‘फोटोकोपी’, ‘प्रेम हे’, ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातील गाण्यांना तिचा आवाज दिला आहे. तसेच तिने ‘वैदेही’ या मालिकेचे शीर्षक गीत गायले आहे.

केतकीला २०१२ साली ‘काकस्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म एँड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. याव्यतिरिक्त ‘टाईमपास’ मधील प्राजूच्या भूमिकेमुळे देखील ती घराघरात पोहोचली. यासोबत ती ‘तानी’, ‘फुंतरू’, ‘आरोही गोष्ट तिघांची’, ‘टाईमपास २’ या चित्रपटात झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियासंदर्भात मोठा निर्णय; वाचून तुम्हीही कराल कौतुक

-‘अक्कल आहे का तुला?’ टास्क दरम्यानच्या धक्काबुक्कीत ‘या’ स्पर्धकावर भडकल्या तृप्ती देसाई

-महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेताना दिसले मिस्टर ऍंड मिसेस टिळक, चाललीये त्यांच्या देवदर्शनाची चर्चा

हे देखील वाचा