Friday, August 1, 2025
Home मराठी अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा बनली आई; दिला गोंडस मुलीला जन्म…

अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा बनली आई; दिला गोंडस मुलीला जन्म…

अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत संग्राम साळवी मराठी कलाविश्वातील चर्चेत असणारे जोडपे आहे नुकतेच या जोडप्याला एक कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ते दोघेही दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. यापूर्वी त्यांना एक गोंडस मुलगा होता. ज्याचा जन्म २ नोव्हेंबर २०२१ रोजी झाला होता. त्याचे नामकरण त्यांनी राघव असे केले होते. 

खुशबू आणि संग्राम यांनी आता चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. त्यांना मुलगी झाली आहे. खुशाबुने यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात तिच्या गरोदरपणाविषयी सांगितले होते. यादरम्यान ती झी मराठीवर सारं काही तिच्यासाठी या मालिकेत काम करत होती. तिच्या सातव्या महिन्याच्या शेवट पर्यंत ती सलग काम करत होती. त्यानंतर तिने सोशल मिडिया पोस्ट करत मालिकेतून निरोप घेतला. यानंतर मालिकेत पल्लवी वैद्य बघायला मिळाली. 

संग्राम आणि खुशबू यांची लग्नगाठ २०१८ साली बांधली गेली होती. त्यांची सोशल मिडीयावर कायमच चर्चा होत असते. त्यांना २०२१ साली मुलगा देखील झाला. ज्याचे नाव पुढे त्यांनी राघव ठेवले. खुशबू हिंदीतील प्रसिध्द तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत देखील काही मर्यादित भागांसाठी दिसली होती. त्याच प्रमाणे तिने सोनी टीव्ही वरील क्राईम पेट्रोल हि मालिका देखील केली आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘शक्तिमान’ने कपिल शर्माला म्हटले असभ्य, अवॉर्ड शोमध्ये नमस्कार न म्हटल्याने अभिनेता संतापला

 

हे देखील वाचा