Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड लाल इश्क! ग्लॅमरस लेहंग्यामध्ये कियारा आडवाणी दिसतीये खूपच सुंदर, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

लाल इश्क! ग्लॅमरस लेहंग्यामध्ये कियारा आडवाणी दिसतीये खूपच सुंदर, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

बॉलिवूडमध्ये येऊन अगदी कमी कालावधीत नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत कियारा आडवाणी हिचा समावेश होतो. अभिनयासोबत तिच्या सौंदर्याच्या देखील सर्वत्र चर्चा असतात. तसेच तिचा फॅशन सेन्स देखील चाहत्यांना खूप आवडतो. बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत तिने तिचा खास आणि खूप मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यामुळे तिचे फोटो व्हायरल व्हायला जास्त वेळ देखील लागत नाही. अशातच सोशल मीडियावर तिचा एक सुंदर फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

फिल्मफेअरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कियाराचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने लाल अत्यंत ग्लॅमरस लेहंगा घालून हटके पोझ दिली आहे. तसेच गळ्यात हेवी ज्वेलरी घातली आहे. कानात ईअरिंग आणि बिंदी लावली आहे. तसेच तिच्या फोटोचे बॅकग्राऊंड देखील लाल रंगाचे दिसत आहे. या फोटोमध्ये ती अगदी एखाद्या परीप्रमाणे दिसत आहे. (Bollywood actress Kiara adawani’s glamorous photo viral on social media)

हा फोटो शेअर करून ‘लाल इश्क’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा ग्लॅमरस लूक खूप आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “वाव,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

कियारा आडवाणीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एका नंतर एक अनेक चित्रपटात दिसणार आहे. ती नुकतेच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिच्या पात्राचे सर्वत्र खूप कौतुक झाले आहे. यासोबत तिने ‘गुड न्यूज’ आणि ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती ‘जुग जुग जियो’ या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. मागील काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या रिलेशनबाबत अनेक चर्चा चालल्या होत्या. त्यामुळे कियारा खूप चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’

-दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

-भारीच ना! अक्षरा सिंगचे ‘दिल की पुकार’ गाणे चाहत्यांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले लाखो हिट्स

हे देखील वाचा