Monday, July 8, 2024

पॅपराजींवर संतापली कियारा आडवाणी, वृद्धांसोबत घडलेल्या प्रकाराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री कियार अडवाणी सध्या सिद्धार्थ मल्हाेत्रासाेबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. हे जाेडपे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समाेर आली आहे. अशातच कियाराच एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये कियारा पॅपराजींवर चिडताना दिसत आहे. त्याचवेळी ती वृद्धांना जाण्यासाठी जागा देत एक बाजूला उभी आहे. 

झाले असे की, कियारा अडवाणी (kiara advani) मुंबईतील एका सिनेमागृहात पोहोचली होती. त्यादरम्यान कियाराचे फाेटाे काढण्यासाठी पॅपराजींची गर्दी जमली हाेती. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लाेकांची वृद्धांना धक्काबुक्की झाली. हे पाहून कियाराला राग आला. कियाराने पॅपराजींना फटकारले आणि म्हटले की, “तुम्ही लोक काय करत आहात?” यानंतर लिफ्टमध्येही कियाराने याेग्य वागणूक दाखवत एका बाजूला उभी राहून त्यांना जाण्यासाठी जागा दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

कियारा पोहोचली ‘छेल्लाे शो’च्या स्क्रिनिंगला
मुंबईला ‘छेल्लो शो’चे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला कियारा अडवाणीसह अनेक स्टार्स पोहोचले होते. यादरम्यान कियाराचा फोटो घेण्यासाठी पॅपराजींची गर्दी जमली होती. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी करण जोहर, दीपिका पदुकोण, विद्या बालन, आदित्य रॉय कपूरसह अनेक स्टार्स पोहोचले होते. हा चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. भारताने ऑस्करसाठी या चित्रपटाची निवड केली आहे.

वृद्धांना विषयी दाखवला आदर
पॅपराजींला फटकारल्यानंतर, कियारा अडवाणीने स्वतः वृद्धांचा आदर केला. लिफ्टमध्ये, कियाराने वृद्धांना आधी जाण्याचा संकेत दिला आणि त्यादरम्यान ती स्वतः लिफ्टमध्ये एका बाजूला उभी राहिली. वृद्ध व्यक्ति लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर कियारा बाहेर आली. यावेळी कियाराची वागणुक खूप नम्र  हाेती.

कियारा पुढच्या वर्षी करणार लग्न
कियारा अडवाणी गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, कियाराने अद्याप लग्नाबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याच वेळी, चाहते या दोघांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून अंदाज लावत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
साजिद खानच्या एन्ट्रीमुळे बिग बॉसचं वाटोळ! तनुश्री दत्ता म्हणाली, मी तर कधीच..

खास क्षण! वैवाहिक आयुष्यात चांगलीच रमलीये काजल, साजरा केला लग्नानंतरचा दुसरा करवा चाैथ

हे देखील वाचा