Wednesday, July 3, 2024

‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा

चित्रपटांसोबतच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​दोघेही त्यांच्या नात्यामुळे सतत प्रकाशझोतात आहेत. दोघे अनेकदा एकत्र दिसतात. त्यामुळे माध्यमांमध्ये अशी बातमी आहे की, कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​एकमेकांना डेट करत आहेत. आता कियाराने तिच्या आणि सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

कियाराने अलीकडेच माध्यमांशी बोलताना, तिच्या चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त, तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले. यादरम्यान, कियाराला विचारण्यात आले की, सिद्धार्थ ​​हा चित्रपट क्षेत्रातील तिच्या खास मित्रांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत ‘शेरशाह’ चित्रपट करताना तिला काय वाटले आणि वैयक्तिकरित्या त्यांची मैत्री कशी आहे?

या प्रश्नाला उत्तर देताना कियारा म्हणाली की, “मला वाटते की, मी माझ्या मित्रांना अगदी माझ्या बोटांवर मोजू शकते. जर मी कोणाची चांगली मैत्रीण असेल तर मी एक अत्यंत प्रामाणिक मैत्रीण आहे. मी माझ्या सर्व मित्रांना महत्व देते. मग ते सिड (सिद्धार्थ मल्होत्रा) किंवा इतर कोणाच्या बाबतीत असो. मी माझ्या मित्रांना हृदयाच्या जवळ ठेवते आणि त्यांच्यासाठी वेळ काढते. मला हे करणे खुप आवडते.”

याव्यतिरिक्त, कियाराने तिचे मित्र आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल बरेच काही सांगितले. सिद्धार्थ ​​आणि कियारा बऱ्याच काळापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत आहेत. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. काही दिवसांपूर्वीच हे दोघे परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिक ‘शेरशाह’ मध्ये दिसले होते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने विक्रम बत्राची भूमिका साकारली होती, तर कियारा आडवाणीने त्याची प्रियसीची डिंपल चीमाची भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी चित्रपटात प्रेक्षकांना खूप आवडली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर कियारा आडवाणी लवकरच ‘भूल भुलैया २’ मध्ये कार्तिक आर्यन आणि ‘आरसी १५’ मध्ये दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरण यांच्यासोबत दिसणार आहे. ‘भूल भूलैया २’मध्ये कियाराबरोबर कार्तिक व्यतिरिक्त तब्बू देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमिताभ यांच्यासोबत असणाऱ्या अफेयरच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या…

आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

यूरोपच्या जंगलांमध्ये बंडखोरीच्या प्रयत्नात दिसला अभिनेता विकी कौशल, फोटो व्हायरल

हे देखील वाचा