Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! कियारा आणि सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्री 2 डिसेंबरला करणार मोठी घोषणा

काय सांगता! कियारा आणि सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्री 2 डिसेंबरला करणार मोठी घोषणा

बॉलिवूड कलाकारांसाठी हे वर्ष आनंदाचे गेले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, या वर्षात अनेक कलाकारांनी संसार थाटला, तर काहींच्या घरी चिमुकल्या पावलांचेही आगमन झाले. अशात आणखी एक कलाकार जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. ते कलाकार जोडपं म्हणजेच कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा होय. अशातच अभिनेत्री कियारा आडवाणी हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत या चर्चांना आणखी वेग दिला आहे.

अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने 2 डिसेंबरला मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. यावरून चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, अभिनेत्री तिच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करणार आहे.

अभिनेत्रीची पोस्ट
अभिनेत्री कियारा आडवाणी हिचा नवीन व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे. तसेच, त्याहून जास्त लक्ष कोणती गोष्ट वेधत असेल, तर ती म्हणजे या व्हिडिओचे कॅप्शन होय. कियाराने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे खूप वेळ लपवले जाऊ शकत नाही. आता लवकरच घोषणा होईल…सोबत राहा… 2 डिसेंबर.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

काय आहे व्हिडिओत?
कियाराने शेअर केलेल्या व्हिडिओत ती हसताना दिसत आहे. या व्हिडिओत तिचा अंदाज सर्वांचे लक्ष वेधणारा आहे. कियाराच्या या पोस्टवर चाहते प्रश्न विचारत आहेत की, तिचा हा व्हिडिओ प्री-व्हेडिंगचा तर भाग नाही ना. तसेच, काही चाहते असेही म्हणत आहेत की, हा व्हिडिओ कोणत्या तरी ब्युटी प्रोजेक्टचा भाग आहे. आणखी एकाने म्हटले की, “ती लग्नाची घोषणा करणार आहे.” खरं तर, कियाराच्या या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अभिनेत्रीचा मित्र काय म्हणाला?
माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, अभिनेत्रीच्या मित्राला जेव्हा विचारण्यात आले की, कियारा जानेवारीमध्ये लग्न करणार आहे का? त्यावर तो म्हणाला की, “मला नाही वाटत की, दोघांपैकी कोणीही आता लग्नाबद्दल विचार करत आहे.” लग्नाच्या सर्व अफवांना नाकारत जोडप्याच्या मित्राने म्हटले की, “कियारा सध्या तिच्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे. अशात लग्न तिच्या कारकीर्दीला ब्रेक लावू शकते. कारण, असे अनेक अभिनेत्रींसोबत पाहिले गेले आहे की, लग्नानंतर त्यांच्या अभिनय कारकीर्दीवर परिणाम होतो.”

मात्र, काही वृत्तांमध्ये असेही म्हटले गेले आहे की, कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani And Sidharth Malhotra) जोडपे पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तसेच, त्यांचे लग्न हे खासगीरीत्या होणार आहे. या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही बाहेरचा व्यक्ती सामील होणार नाही. तसेच, जोडपे आधी दिल्लीत जाऊन रजिस्टर पद्धतीने लग्न करेल आणि नंतर रिसेप्शन करून एक पार्टीही ठेवणार असल्याची चर्चा आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
नादच खुळा! पुण्याच्या ‘गोल्डन बॉईज’ची बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री, एमसी स्टॅनशी होतेय तुलना?
अरे व्वा! प्रेमासाठी त्याग, संघर्ष करणाऱ्या प्रेमवीरांचा सिनेमा 9 डिसेंबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा