Wednesday, July 3, 2024

कॅन्सरशी लढत असलेल्या अभिनेत्री किरण खेर कोरोना रुग्णांच्या मदतीला, व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी दिले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार वाढला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीयेत. सरकार देखील संपूर्ण खबरदारी घेऊन रुग्णांची काळजी घेत आहे. परंतु सोयी- सुविधांचा योग्य पुरवठा न झाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लगाला आहे. भारतातील हे संकट बघून अनेकांनी मदत केली आहे. अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते आणि खेळाडूंनी देखील मदत केली आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर या देखील कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्यांनी कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

अभिनेत्री किरण खेर या मागील काही दिवसांपासून कॅन्सरशी लढत आहेत. त्यांनी कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी चंदिगढला एक कोटी रुपयांची मदत केली आहे. किरण यांनी या गोष्टीची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

त्यांनी लिहिले आहे की, “आशा आणि प्रार्थनेच्या रुपात मी एमपी फंडमधून कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी चंदिगढला एक कोटी रुपये देत आहे. या संकट समयी मी सगळ्यांसोबत उभी आहे.”

अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर या न केवळ एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेत, पण त्या एक राजनेत्याही आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्या भाग घेत असतात.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढतच चालला आहे. या कठीण प्रसंगी अभिनेता सोनू सूद हा देखील मागील वर्षापासून मदत करत आहे. या व्यतिरिक्त असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी या काळात मदत केली आहे. या वेळी भारतात मुख्य व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर, रेमेडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. अशा वेळी किरण खेर यांनी अनेकांचे जीव वाचवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारनंतर आता पत्नी ट्विंकल खन्नाही आली कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून, थेट यूकेवरून मागवणार १०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्स

-‘वयाच्या १२ व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, म्हणत अभिनेत्री इलियाना डिक्रूजने केले भाष्य

-‘तुम्ही भारताला कोरोना लसीचा पुरवठा करू शकता का?’ भारताची वाईट परिस्थिती पाहून प्रियांका चोप्राचे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ट्वीट

हे देखील वाचा