‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध जोडपे किश्वर मर्चंट आणि सुयश राय हे नुकतेच आई बाबा झाले आहेत. किश्वरने शुक्रवारी एका मुलाला जन्म दिला आहे. सुयशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून किश्वर आणि त्याच्या मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर लिहिले की, “२७.०८.२१, बेबी राय यांचे स्वागत करा. मुलगा जन्मला आहे. सुकिशचे बाळ.” या पोस्ट फोटोमध्ये तिघेही एकत्र दिसत आहेत. किश्वर आणि सुयश फोटोत आपल्या मुलाला मिठी मारताना दिसत आहेत. हा पोस्ट केलेला फोटो खूपच गोंडस आहे. कुटुंब, मित्र तसेच चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
किश्वरने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “आम्ही दोघांनी ठरवले आहे की, आम्ही आमच्या बाळाला किमान ४० दिवस सोशल मीडियापासून दूर ठेवू. जुन्या प्रथेचे पालन करून, आम्ही काही काळ आमच्या मुलाचा चेहरा दाखवणार नाही.”
त्याचबरोबर सुयाशने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, “जे आपल्या मुलांना सोशल मीडियावर दाखवत आहेत, ही त्यांची इच्छा आहे. पालकांना त्यांच्या मुलांचे सामाजिकीकरण करायचे आहे की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे.”
सुयश पुढे म्हणाला की, “किश्वरने एक आई असल्याच्या नात्याने आमच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.” अभिनेत्री किश्वर सोशल मीडियावर तसेच यूट्यूबवर नेहमी सक्रिय असते. इतकेच नव्हे तर तिने तिच्या गर्भधारणेशी संबंधित गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या.
किश्वर मर्चंटच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘हिप हिप हुर्रे’, ‘एक हसीना थी’, ‘इतना करो ना मुझे प्यार’, ‘हर मुश्किल का हल अकबर बिरबल’ आणि ‘प्यार की ये एक कहानी’या मालिकेमध्ये काम केले आहे. २०१५ मध्ये रियॅलिटी शो ‘बिग बॉस ९’ मध्ये ती स्पर्धक होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तरुणींनाही लाजवेल असं आहे तिचं सौंदर्य! पाहा सिल्व्हर आऊटफिटमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज
-‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता