Friday, July 5, 2024

क्रिस्टल डिसूझाच्या खात्यात आणखी एक चित्रपट, इमरान हाश्मीनंतर आता ‘या’ अभिनेत्यासोबत करणार काम

टेलिव्हिजनच्या दुनियेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर, क्रिस्टल डिसूझाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. ‘चेहरे’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता क्रिस्टलच्या हातात आणखी एक चित्रपट आला आहे. ती फरदीन खानच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

फरदीन खान ११ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. नुकतीच त्याने पुनरागमनाची घोषणा केली आहे. तो ‘विस्फोट’ या चित्रपटातून पुनरागमन करणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात क्रिस्टल डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०१२ च्या रॉक, पेपर, सीझर चित्रपटाचे अधिकृत रूपांतर आहे.

लवकरच सुरू होईल शूटिंग
‘विस्फोट’मध्ये फरदीन खानसोबत रितेश देशमुख आणि प्रिया बापटही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे फरदीन आणि रितेश १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, क्रिस्टल लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ती म्हणाली की, “मी या चित्रपटाचा भाग होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. त्याची स्क्रिप्ट छान आहे. ही कथा ऐकल्यावरच मला वाटलं की, मी त्याचा भाग व्हायला हवं. माझे पात्र खूप छान आहे. आमची टीम विलक्षण आहे आणि मी त्यावर काम करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.”

रितेश देशमुखचे केले कौतुक
क्रिस्टल पुढे म्हणाली की, “मला रितेश नेहमीच ऑनस्क्रीन खूप आवडतो. तो त्याच्या व्यक्तिरेखेकडे चमकदारपणे पोहोचतो. फरदीन हा सर्वोत्कृष्ट आहे ज्याला आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले केले आहे. मला माहित आहे की, या चित्रपटात काम करणे एखाद्या मजेदार राईडपेक्षा कमी नसेल.”

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले, तर त्याची कथा मुंबईच्या डोंगरी भागावर आधारित आहे. ज्यामध्ये रितेश आणि फरदीन एकमेकांच्या विरुद्ध दिसणार आहेत. टी-सीरिज आणि संजय गुप्ता प्रस्तुत ‘विस्फोट’ भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराधा गुप्ता आणि संजय गुप्ता निर्मित आणि कुकी गुलाटी दिग्दर्शित करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कॅटरिना कैफने सलमान खानवर लावले ‘हे’ आरोप, अभिनेत्याची प्रतिक्रियाही होती बघण्यासारखी

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

-रोहित शेट्टीने रणवीर सिंगला ‘सूर्यवंशी’मधून रोल कट करण्याची दिली धमकी, काय आहे प्रकरण?

हे देखील वाचा