Saturday, July 6, 2024

‘घोडे पे सवार’ गाण्यावर थिरकताच अभिनेत्री ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अगं किती मोठे ओठ’

कलाकार आणि ट्रोलिंग हे समीकरण काही नवीन नाही. कलाकारांना कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यामध्ये आता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. क्रिस्टल ही छोट्या पडद्यावरील मोठे नाव आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि सुंदरतेने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अभिनयाव्यतिरिक्त क्रिस्टल तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. मात्र, ती नुकतीच त्याच्या एका व्हिडिओमुळे भलतीच ट्रोल झाली.

अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा (Krystle D’Souza) हिने शुक्रवारी (दि. 06 जानेवारी) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेअर केली होती. या व्हिडिओत ती ‘घोडे पे सवार’ (Ghodey Pe Sawaar) डान्स करताना दिसत होती. यामध्ये ती सुंदर लेहंग्यात चोळी आणि ओढणीसोबत दिसली. तिने तिचा लूक पारंपरिक आभुषणांनी पूर्ण केला होता.

अभिनेत्रीच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. काहींना तिचा हा अंदाज आवडला, तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी असाही दावा केला की, तिने ओठांची सर्जरी केली होती. एक युजर कमेंट करत म्हणाला की, “खूप मोठे ओठ.” दुसऱ्या एकाने म्हटले की, “तुझ्या ओठांना काय झालंय?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Krystle Dsouza (@krystledsouza)

क्रिस्टल डिसूझाबद्दल थोडक्यात
अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा हिने 2007मध्ये टीव्ही जगतात पाऊल ठेवले होते. मात्र, तिला 2011मध्ये ‘एक हजारों में मेरी बहना है’ मालिकेतील ‘जीविका’ पात्रासाठी प्रसिद्धी मिळाली होती. नंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अभिनेत्रीने नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. कारण, तिचे नाव तिच्या सहकलाकारांसोबत जोडले गेले आहे. अभिनेत्री क्रिस्टल ही अभिनेता करण टेकरसोबत नात्यात होती, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनीही काही काळानंतर आपले मार्ग वेगळे केले. काही महिन्यांपूर्वी असे वृत्त होते की, क्रिस्टल ही रेस्टॉरंट व्यावसायिक गुलाम गौसे दीवानी याला डेट करत आहे. कथितरीत्या दोघेही अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. (actress krystle dsouza gets trolled for sharing video users commenting on her lips)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जरा दमानं! ऐश्वर्याने भर कार्यक्रमात सर्वांपुढे अभिषेकसोबत केले होते फ्लर्ट; रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद
बोंबला! महेश बाबूचा भाऊ चौथ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत? किसींग व्हिडिओवर भडकली तिसरी पत्नी

हे देखील वाचा