Tuesday, July 9, 2024

Leena Maria Paul | फसवणूकीच्या प्रकरणात तुरुंगात असलेली ‘ही’ अभिनेत्री कैद्यांना देतेय रोजगाराचे धडे

मद्रास कॅफे‘ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि तिचा पती सुकेश चंद्रशेखर २०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहेत. महिला कैद्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून लीना आता तुरुंगात जॅम आणि जेली बनवायला शिकत आहे.

गेल्या एक वर्षापासून तुरुंगात असलेली शास्त्रीय नृत्यांगना लीना सांस्कृतिक कार्यातही सक्रिय सहभाग घेते, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. जॅम आणि जेली व्यतिरिक्त, कैद्यांसाठी कला, संगीत, नृत्य, योग आणि लोणचे बनवण्याचे वर्ग देखील आयोजित केले जातात, असे ते म्हणाले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लीना तुरुंगात असल्यापासून ती इतर कैद्यांप्रमाणेच तिचा वेळ नवीन गोष्टी शिकण्यासाठी वापरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती आठवड्यातून दोनदा जॅम आणि जेली बनवण्याच्या क्लासला जाते. त्याचबरोबर लीनाने नेल आर्ट आणि मेकअपचे क्लासेसही घेतले आहेत. अभिनेत्री तिहार तुरुंगातील सहा क्रमांकाच्या विंगमध्ये आणि सुकेश चंद्रशेख क्रमांक बन विंगमध्ये बंद आहे.

रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंह यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी लीना आणि चंद्रशेखर यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. लीना आणि चंद्रशेखर यांच्यावर २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील इतर आरोपींसह लीना आणि चंद्रशेखर कोठडीत आहेत, ज्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत आहे.

यासोबतच दोघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) तरतुदीनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लीना आणि चंद्रशेखर यांनी हवाला मार्गाचा वापर करून पैसे लपवण्यासाठी इतरांसोबत काही कंपन्या स्थापन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोघांनाही अटक केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा