Sunday, February 23, 2025
Home मराठी ‘स्त्री जन्माला येत नाही तिला घडवले जाते’ म्हणत अभिनेत्री मधुराणी गोखलेने स्त्रीवर व्यक्त केले प्रगल्भ विचार

‘स्त्री जन्माला येत नाही तिला घडवले जाते’ म्हणत अभिनेत्री मधुराणी गोखलेने स्त्रीवर व्यक्त केले प्रगल्भ विचार

मराठी मालिकाविश्वातील आजच्या घडीची टॉपची आणि लोकप्रिय मालिका म्हणजे सर्वांचीच आवडती ‘आई कुठे काय करते?’. आपल्या परिवारासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी स्वतःला झोकून सतत जगणाऱ्या एका स्त्रीच्या आयुष्यात नवऱ्याने दिलेल्या धोक्यानंतर ती स्त्री कशी स्वतःला सावरत पुन्हा सर्वच बाजुंनी सक्षम होते. हा मालिकेचा प्लॉट सर्वानाच खूप रुचत आहे. त्यामुळेच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेसोबतच यात काम करणाऱ्या सर्वच कलाकारांनी देखील त्यांची ओळख निर्माण केली. मात्र या सगळ्यांमध्ये ‘अरुंधती’ ही भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरने तिची एक खास छाप सोडली आहे.

मधुराणी एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम माणूस देखील आहे. तिच्या बोलण्यातून, तिच्या विचारांमधून नेहमीच त्याच्यातील प्रगल्भतेची जाणीव आपल्याला होत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मधुराणीने तिचे स्त्रीबद्दल काही विचार मांडले, जे नेटकऱ्यांना खूपच आवडत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने तिचे मत मांडले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “स्त्री जन्माला येत नाही तर ती ‘घडवली ‘जाते’. सिमोन दि बोव्हा ह्या फ्रेंच विचारवंत लेखिकेच्या ‘ The Second Sex ‘ ह्या पुस्तकातलं सर्वात महत्त्वाचे हे वाक्य. स्त्री विषयी बोलताना ह्या ओळीच्या उल्लेखानेच होऊ शकते. विचार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हे वाचायलाच हवं.”

हा व्हिडिओ एका मुलाखतीचा एक छोटासा भाग आहे. यात ती म्हणते, “स्त्री ही जन्माला येत नाही तर तिला घडवले जाते. संस्कार, समाज तिला विविध पद्धतीने घडवत असतो. समाज, आपली संस्था, परंपरा ठरवतात की, स्त्रियांनी कसे वागले पाहिजे. समाजाप्रमाणे ती स्त्री वागली तरच ती योग्य आणि आदर्श स्त्री मानली जाते”.

पुढे मधुराणी बोलते, “स्त्रियांनी तोंड करुन वर बोलू नये, उलट उत्तर देऊ नये, तिने प्रश्न विचारलेले चालणार नाही. कुटुंबातील इतर पुरुषांच्या एक पाऊल मागेच पाहिजे, तिने प्रगती करू नये हे समाजच ठरवत असते. काही ठिकाणी तर यशस्वी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोनही विकृत आहे”. सर्वांनीच तिच्या या विचारांना बरोबर सांगितले. सोबतच तिचे कौतुक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा